धाडसी युवकांनी वाचवले पुरात वाहून जाणा:या सहा जणांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:18 IST2019-09-23T12:18:47+5:302019-09-23T12:18:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील राजापूर येथे शिवण नदी पात्रात वाहून जाणा:या तीन महिला आणि तीन पुरुषांना युवकांनी ...

धाडसी युवकांनी वाचवले पुरात वाहून जाणा:या सहा जणांचे प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील राजापूर येथे शिवण नदी पात्रात वाहून जाणा:या तीन महिला आणि तीन पुरुषांना युवकांनी मोठय़ा धाडसाने पाण्याबाहेर काढत मदतकार्य केल़े फरशी पुलावरुन पायी जाताना पाणी आल्याने सर्व महिला आणि पुरुष वाहून गेले होत़े
रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ राजापूर येथील धर्मा पवार, सविता पवार, बाबीबाई राठोड, कृष्णा जाधव, वंदना पवार आणि लालसिंग गावीत हे सहा जण शेतातील कामे आटोपून चार वाजेच्या सुमारास घराकडे परत येत होत़े दरम्यान दुपारी झालेल्या पावसामुळे गावाजवळून वाहणा:या शिवण नदीचे पाणी फरशी पुलावरुन वाहत असल्याचे त्यांना दिसून आल़े पाच मिनीटाच्या अंतरावर गाव असल्याने महिला आणि पुरुषांनी एकमेकांचा आधार घेत पाण्यातून वाट काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला़ सहाही जण फरशी पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर पाण्याचा मोठा लोंढा आल्यानंतर वाहून गेल़े अचानक झालेल्या या घटनेवेळी मागून येणा:या इतर शेतमजूरांना ही घटना दिसून आल्यावर त्यांनी आरडाओरड सुरु केल्याने गावातील मंदिरावर बसलेल्या युवकांनी नदीत उडय़ा टाकून महिला आणि पुरुषांना सुखरुप बाहेर काढल़े
गावापासून अर्धा किलोमीटर्पयत वाहून गेलेल्या महिला आणि पुरुषांचा आवाज ऐकून किशोर पवार, कृष्णा पवार, शरद जाधव, रामलाल पवार या युवकांनी पुराच्या पाण्यात उडय़ा टाकल्या़ प्रथम महिलांना आणि त्यानंतर पुरुषांना सुखरुप बाहेर काढल़े काठावर आणल्यानंतर नाकातोंडात पाणी गेलेल्यांना तातडीने मदत उपलब्ध करुन देत ग्रामस्थांनी त्यांना घरार्पयत सोडून दिल़े
अनेक वर्षापासून फरशीपुलाची उंची वाढावी म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आह़े नंदुरबारकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग असल्याने रात्री अपरात्री येथून वाहने आणि पायीच नागरिक प्रवास करतात़ पुलावर पाणी असल्यास थोडे थांबून पुढे जातात़ या भागात ग्रामस्थांचा वावर असतो़ रविवारी लगतच्या मंदिरावर हजर असल्याने मोठा अनर्थ टळला़ बचाव कार्य करणारे शरद जाधव यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून पाण्याचा जोर असल्याने मार्गावरुन प्रवास करणे जिकिरीचे झाले आह़े