जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:15 IST2019-11-14T12:15:48+5:302019-11-14T12:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना जिल्ह्यात विविध उद्योग धंदे व कामाच्या ठिकाणी बाल ...

जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी धाडसत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना जिल्ह्यात विविध उद्योग धंदे व कामाच्या ठिकाणी बाल कामगार आढळून येतात. अशा बालकांच्या सुटकेसाठी बालदिनानिमित्त महिनाभरात जिल्ह्यात प्रत्येक कामाच्या ¨ठकाणी अचानक धाड टाकण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंडळामार्फत सांगण्यात आले.
जिल्ह्यातील हॉटेल, दुकाने, बाधकाम व विटभट्टी अशा ठिकाणी बालकामगार दिसून येतात. बालकामगार ठेवणे ही बाब कायद्याने गुन्हा असतानाही काही मालक, ठेकेदारांमार्फत कमी वयातील मुलांकडून काम करुन घेण्याची प्रथा आहे. या प्रथेवर नियंत्रण आणण्यासाठी बालदिनानिमित्त विशेष मोहिम आखण्यात येणार आहे. महिनाभरात मालक व पालकांमध्ये जनजागृती करीत बालकांना कामावर न ठेवण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.
या अभियानाला 7 नोव्हेंबरपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. परंतु शाळांना सुटय़ा असल्यामुळे शाळा वगळता अन्य ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे, त्याद्वारे बालकामगार मुक्तीसाठी मालकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे कामगार मंडळ अधिकारी के.के.जोशी यांनी सांगितले. टप्प्या-टप्प्याने रेल्वे स्थानके, बसस्थानके व शाळांध्येही हे अभियान राबविण्यात येणार आहे. शिवाय 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत दोषी आढळून येणारे ठेकेदार व मालकांवर कायदेशिर कायरवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. याबाबत अधिकारी व कर्मचा:यांमध्येही जनजागृती होणार आहे.
रोजगारासाठी स्थलांतर करणा:या पालकांसोबत कुटुंबातील सहा ते 14 वर्ष वयोगटातील मुलेही स्थलांतरीत होतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत सव्र्हे करण्यात आला. या सव्र्हेमध्ये जिल्ह्यात 199 शाळाबाह्य मुलेही आढळऊन आले. त्यात धडगाव तालुक्यात सर्वाधिक 163, अक्कलकुवा तालुक्यात 33 तळोदा तालुक्यात दोन व शहादा तालुक्यात एक अशी संख्या आहे. या बालकांच्या विकासासाठी प्रशासन कुठली भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.