साक्री नाका परिसरात एकास दाम्पत्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:37 IST2019-12-25T12:36:57+5:302019-12-25T12:37:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील साक्री नाका परिसरात किरकोळ वादातून पती-पत्नीने एकास बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना ...

A couple were beaten to death in the Sakri Naka area | साक्री नाका परिसरात एकास दाम्पत्याची मारहाण

साक्री नाका परिसरात एकास दाम्पत्याची मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील साक्री नाका परिसरात किरकोळ वादातून पती-पत्नीने एकास बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली़ मारहाणीत जखमी झालेल्या युवकाच्या जबाबावरुन सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला़
गौतम दगा मोरे असे जखमीचे नाव आहे़ सोमवारी सायंकाळी साक्रीनाका परिसरातील जलाराम मंदिरासमोर असलेल्या सिमेंटच्या घराच्या बाजूला उभा असल्याचे पती पत्नीला दिसून आले़ त्यांनी गौतम मोरे यास हटकल्यानंतर वादाला सुरुवात झाली़ यात पटेल नामक दाम्पत्याने वीट व काठीने मोरे यास बेदम मारहाण केल्याने त्याच्या डोळ्यावर जखम झाली़ त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार पूर्ण झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पटेल दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़

Web Title: A couple were beaten to death in the Sakri Naka area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.