शहादा केंद्रात आजपासून सुरु होणार कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:46 IST2020-02-10T12:42:18+5:302020-02-10T12:46:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरशन आॅफ इंडिया सोमवारपासून ...

Cotton shopping will start today at the Shahada Center | शहादा केंद्रात आजपासून सुरु होणार कापूस खरेदी

शहादा केंद्रात आजपासून सुरु होणार कापूस खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरशन आॅफ इंडिया सोमवारपासून पुन्हा कापूस खरेदी सुरु करणार आहे़ या पार्श्वभूमीवर रविवारी केंद्रात १०० वाहनांमध्ये कापूस आणला गेला असून सोमवारी आणखी १०० वाहने दाखल होणार असल्याने कापूस हंगाम यंदाही सुसाट असल्याचे सिद्ध झाले आहे़
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये सीसीआयकडून होणारी कापूस निर्यात थांबली आहे़ परिणामी शहादा आणि नंदुरबार केंद्रातील कापूस खरेदी थांबली होती़ साठा करण्यासाठी जागा नसल्याने कापूस खरेदी तब्बल आठ दिवसांपासून बंद पडली होती़ शहादा आणि नंदुरबार केंद्रात खरेदी केलेल्या कापसासह जिनिंगमध्ये किमान १ हजार गाठी पडून होत्या़ कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरु झाले होते़ यंदा कापूस हंगाम लांबला असल्याने बहुतांश ठिकाणी अद्यापही कापूस वेचणी सुुरु आहे़ शेतात आणि घरी कापूस साठा करुन ठेवल्यास चोरीची भिती असल्याने शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी बाजारात चकरा मारत होते़ यातच खरेदी बंद झाल्याने अनेकांनी नुकसानीला घाबरुन खेडा खरेदी करणाऱ्यांना कापूस विक्री केला होता़
निर्माण झालेल्या या स्थितीवर सिसीआयने तोडगा काढून कापूस खरेदी करण्याचे आदेश केंद्रांना दिले होते़ यात नंदुरबार केंद्राने गुरुवारी कापूस खरेदीला प्रारंभ केला़ तर शहादा केंद्रात सोमवारी सकाळी कापूस खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ सीसीआय शेतकºयांना कापूस खरेदी केल्यानंतर किमान आठ दिवसात पेमेंट करत असल्याने बहुतांश शेतकºयांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आहे़ विशेष बाब म्हणजे मध्यप्रदेशातील कापूसही जिल्ह्यातील जिनिंगमध्ये शेतकºयांकडून विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती आहे़

सोमवारपासून कापूस खरेदी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहादा केंद्रात रविवारी चार वाजेपर्यंत ११० वाहने दाखल झाली होती़ यातील कापूस खरेदीला सोमवारी सुरुवात होणार आहे़ प्रतीक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५४० या दरम्यान कापूस दर देण्यात येत असल्याने शेतकरी येथे कापूस देण्यास उत्सुक आहेत़ सोमवारी सकाळी किमान १०० वाहनांची आवक होणार असल्याची माहिती आहे़ यातून शहादा केंद्रात एका दिवसात २० हजार क्विंटलच्यापुढे कापूस खरेदी होणार आहे़ शहादा येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात १ लाख १० हजार क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी झाला आहे़ सोमवारनंतर त्यात सातत्याने वाढ झाल्यास हंगामाअखेर शहादा बाजारसमिती १ लाख ७५ हजार क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक कापूस खरेदी करु शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे़

नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील बाजार समितीच्या खरेदी केंद्रात गुरुवारपर्यंत ५१ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला होता़ गुरुवारी खरेदी पुन्हा सुरु झाल्यानंतर यात दीड हजार क्विंटलने वाढ झाली आहे़ सोमवारपासून येथे कापूस आवक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आहे़ सीसीआयने पाच वर्षाच्या कालावधीनंतर येथून एवढ्या ५० हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केला आहे़ बाजारात केवळ सीसीआयच खरेदी करत असल्याने त्यांच्या आवकमध्ये वाढ होऊन यंदाच्या वर्षी खरेदीचा विक्रम होणार आहे़

Web Title: Cotton shopping will start today at the Shahada Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.