शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

वादळी पावसाने तळोद्यात कापूस, पपईचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 3:09 PM

50 एकर क्षेत्रातील पिकांना हाणी : मोहिदा, कळमसरे, सिलींगपूर परिसराला तडाखा

तळोदा : मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील मोहिदा, कळमसरे, सेलिंगपूर शिवारातील कापूस, पपई, केळी व उसाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. साधारण 40 ते 50 एकर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतक:यांचे  म्हणणे आहे. दरम्यान महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून, शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.तळोदा तालुक्यातील रांझणी, मोड, मोहिदा परिसरात मंगळवारी दुपारी अचानक वादळी पाऊस पडला. तब्बल तास भर झालेल्या मुसळधार पावसाने पपई, कापूस, केळी व ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. वदळाचा वेग इतका होता की, त्यात गणेश पाटील यांच्या अडीच एकरातील पपईची झाडे अक्षरश: मोडून पडली आहेत. याशिवाय  कापूस व ऊसदेखील अक्षरश: भुईसपाट झाली आहेत. तब्बल तीन आठवडय़ापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र  मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने साहजिकच या भागात शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  तथापि काही शेतक:यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळी पावसाने हिरावल्याने या शेतक:यांमध्ये नैराश्य पसरले आहे. वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक:यांमध्ये गणेश शंकर पाटील यांचे चार एकर पपई, बाळू नथ्थू शिंदे यांचा चार एकर कापूस, मगन दत्तू शिंदे यांचा चार एकर कापूस, लक्ष्मण पुंडलिक चौधरी यांचा तीन एकर कापूस, रमण परशराम शिंदे यांचा चार एकर कापूस, मणिलाल छगन पाटील यांचा तीन एकर कापूस, उत्तमसिंग हिम्मतसिंग गिरासे यांचा दोन एकर कापूसाचे नुकसान         झाले.याबाबत मोहिदाचे उपसरपंच आनंद चौधरी, लक्ष्मण शिंदे, धनंजय शिंदे, संजय चव्हाण, विठ्ठल पाटील यांनी महसूल प्रशासनास नुकसानीची माहिती दिल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तलाठी धनगर व के.एस. पाटील यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या कर्मचा:यांनी बुधवारी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केल्यानंतर पंचनाम्यांची कार्यवाही सुरू केली आहे. या वादळी पावसामुळे शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी या शेतक:यांची मागणी आहे.