‘रेड कॉटन बग’च्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:39 IST2019-11-26T12:39:21+5:302019-11-26T12:39:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : तळोदा तालुक्यातील काही भागात कापूस पिकावर ‘रेड कॉटन बग’ किटकांचा प्रादुर्भाव झाला असून गेल्या ...

‘रेड कॉटन बग’च्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक चिंतेत
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमावल : तळोदा तालुक्यातील काही भागात कापूस पिकावर ‘रेड कॉटन बग’ किटकांचा प्रादुर्भाव झाला असून गेल्या काही दिवसांपासून हा प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांच्या चिंता वाढल्या आहे.
तळोदा तालुक्यातील काळ्या सुपीक जमिनीतून कापसाचे सरासरी हेक्टरी उत्पादन जास्त प्रमाणात मिळत असल्याने दिवसेंदिवस कापूस पिकाच्या क्षेत्रात वाढ होत आहेत. कमी कालावधीत भरघोस उत्पादन यामुळे कापसाचे उत्पादन घेण्याची चढाओढच गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. मात्र तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीतून कापूस पिकाला सावरण्याचा प्रय} शेतक:यांकडून झाल्याने परिसरात बहुतांश क्षेत्रात लागवड असलेल्या कापूस पिकांची समाधानकारक वाढ झाली होती. त्यामुळे शेतक:यांना समाधानकारक उत्पादन मिळेल, अशी आशा लागून होती. परंतु परतीच्या संततधार पावसामुळे कापूस पिकातील आंतरमशागतीची कामे थांबल्याने पिकामध्ये तणाचे प्रमाण वाढले. तसेच ढगाळ वातावरणाचा कालावधीही जास्त राहिल्याने कापूस पिकावर गेल्या काही दिवसांपासून ‘रेड कॉटन बग’ या किटकांचा प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांच्या चिंतेत भर पडली आहे. आधीच अवकाळीचा मार बसल्याने नुकसान झाले असताना त्यात ‘रेड कॉटन बग’ किटकांचा प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने कृषी विभागाने भेट देऊन मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.