कापूस बोंडअळी नुकसानीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:01 IST2019-05-14T12:01:16+5:302019-05-14T12:01:40+5:30

शेतकऱ्यांची फिरवाफिरव : दुष्काळात तेरावा महिना

 Cotton bundlow damages money on account of another | कापूस बोंडअळी नुकसानीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर

कापूस बोंडअळी नुकसानीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर

नंदुरबार : कापूस बोंड अळी नुकसानीचे अनुदान दुसºयाच शेतकºयाच्या खात्यावर टाकल्यानंतर तीन महिन्यात ते मुळ खातेदार शेतकºयाच्या नावावर वर्ग होत नसल्यामुळे संबधीत शेतकरी हैराण झाले आहेत. याबाबत तहसील कार्यालयातून संबधीत अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार शेतकºयाने केली आहे.
गेल्या वर्षी कापूस बोंडअळीमुळे पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून जानेवारी महिन्यात नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी शासनाने अनुदान मंजुर केले होते. त्याअंतर्गत येथील तहसील कार्यालयाकडून संबधीत शेतकºयांच्या खात्यावर ते वर्गही करण्यात आले. परंतु काही शेतकºयांचा खाते नंबर चुकल्याने ते दुसºया शेतकºयाच्या खात्यावर वर्ग झाले. याबाबत शेतकºयांनी ते संबधीत अधिकाºयांना निदर्शनासही आणून दिले. त्यानंतर खात्यावरील अनुदानाचे पैसे मागे घेण्यात आले. परंतु मुळ शेतकºयाला ते पैसे अद्यापही मिळालेले नाहीत.
संबधीत शेतकरी तहसील कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहेत. दरवेळी काहीना काही उत्तर देवून वेळ निभावून नेली जात आहे. संबधीत अधिकारी देखील समाधानकारक उत्तर देत नाही. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
लाभार्थी शेतकºयांच्या नावावर तातडीने पैसे वर्ग करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title:  Cotton bundlow damages money on account of another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.