अतिक्रमण करणाऱ्यांकडून पालिका वसुल करणार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:48 IST2019-12-24T11:47:51+5:302019-12-24T11:48:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगरपालिका हद्दीत सार्वजनिक रस्त्याच्या जागेत केलेले कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा खर्च पालिका ...

अतिक्रमण करणाऱ्यांकडून पालिका वसुल करणार खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नगरपालिका हद्दीत सार्वजनिक रस्त्याच्या जागेत केलेले कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा खर्च पालिका अतिक्रमणधारकांकडून वसूल करणार आहे़ पालिकेकडून शहरातील विविध अतिक्रमणांची चौकशी सुरु असून येत्या काळात कारवाई सुरु होणार आहे़
शहरातील विविध भागात सार्वजनिक जागी लॉरी, टपºया ठेवत ओटे, जिने आणि पायºया काढून अतिक्रमण करण्यात आले आहे़ या अतीक्रमणांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे़ यातून अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या़ अतिक्रमणाबाबत पालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेत शहरातील विविध भागात वाढीस लागलेल्या अतिक्रमणांची माहिती पालिका प्रशासन घेत असून यानुसार अतीक्रमण हटाव मोहिमेची तयारी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पालिका मुख्याधिकारी डॉ़ बाबुराव बिक्कड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन अतिक्रमणांबाबत चर्चा होणार आहे़
जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूकांची प्रक्रिया सुरु असल्याने पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने अतिक्रमण हटाव मोहिम नव्या वर्षात होण्याची शक्यता आहे़ अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे़