कोरोनात मानसिक आरोग्य सुरक्षित परंतु दक्षताही आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:42 PM2020-03-29T12:42:27+5:302020-03-29T12:42:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असले तरी नंदुरबार जिल्हा पूर्ण खबरदारी घेत आहे. त्यातच जिल्ह्यातील ...

Coronas need mental health safe but also vigilance | कोरोनात मानसिक आरोग्य सुरक्षित परंतु दक्षताही आवश्यक

कोरोनात मानसिक आरोग्य सुरक्षित परंतु दक्षताही आवश्यक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असले तरी नंदुरबार जिल्हा पूर्ण खबरदारी घेत आहे. त्यातच जिल्ह्यातील मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत नसल्याने कोरोनाबाबत ही बाब सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी मानसिक त्रासाबाबत जिल्हावासियांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. अनावश्यक काळजी न घेता आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्लाही घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे.
जगभर निर्माण झालेले संकट नंदुरबार जिल्ह्यात पोहोचले नसले तरी शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहे. त्यात संपूर्ण जिल्हा प्रशासनाने स्वच्छता, जनजागृती व होम क्वॉरंटटाईनवर सर्वाधिक भर दिला आहे. या उपाययोजनेला आरोग्य व पोलीस यंत्रणेचे चांगले योगदान लाभत आहे.
या उपाययोनेपैकीच अत्यावश्यक असलेल्या मानसिक आराग्याबाबत जनजागृती करणे देखील आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. त्यात कोरोनामुळे अनेकांची चिंता व ताण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही, परंतु कोरोनाबाबत अनावश्यक चिंता करण्याची गरज नसल्याचे जिल्हा रुग्णालयामार्फत सांगण्यात येत आहे. जिल्ह्यासियांना कोरोनापाठोपाठ मानसिक आजाराबाबत आवश्यकता भासल्यास तातडीने तज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन देखील जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत करण्यात येत आहे.

मानसिक आरोग्यासाठी आवश्यक बाबी

नियमित व्यायाम व प्राणायाम.
सोशल मीडियावर मयार्दा आणणे.
कामाचे नियोजन करीत नियमित कामात व्यस्त राहणे.
सकारात्मक विचार करणे.
पूर्ण झोप घेत कुटुंबाला वेळ देणे.
भावनिक आधार देत एकमेकांना समजून घेणे.
कलागुण व मानसिक क्षमता ओळखत वाव देणे.

Web Title: Coronas need mental health safe but also vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.