कोरोनाचा कायदा व्यवस्थापनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST2021-06-03T04:21:58+5:302021-06-03T04:21:58+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केेले गेले. त्याचा चांगला-वाईट परिणाम येत्या काळात दिसून येतील. त्यासाठी आपणही आगामी ...

कोरोनाचा कायदा व्यवस्थापनावर परिणाम
नंदुरबार : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केेले गेले. त्याचा चांगला-वाईट परिणाम येत्या काळात दिसून येतील. त्यासाठी आपणही आगामी बदलांना तयार असले पाहिजे, असा सूर ‘कोरोना महामारीचा शैक्षणिक व कायदा व्यवस्थापन परिणाम’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला.
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोविड-१९ या महामारीचा शैक्षणिक व कायदा व्यवस्थापन पद्धतीवरील परिणाम’ या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.एम.एस. रघुवंशी होते. डॉ.एन.डी. चौधरी व प्रा.डॉ.एम.एस. रघुवंशी यांनी कोविड-१९ या महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात बदल होऊन हे बदल भविष्यात मोठे परिणाम करणारे आहेत. बदल हे विशेषतः विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे असल्याचे मत व्यक्त केले.
चर्चासत्रात महाविद्यालयाच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला. आचल रघुवंशी, शमीम पठाण, हर्षल पाटील, प्रीतम निकम, रूपाली कोळी, नरेंद्र हिरणवाला, विनीत बडगुजर, किर्तेश जगताप, कांचन पाटील, दीपक अहिरे, काजल अग्रवाल, देवयानी शेवाळे, अंतिमा राजभर यांनी सहभाग घेतला.
चर्चासत्र आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. ललित सूर्यवंशी यांनी आभार मानले.