मोठे उदेपूर मोठे येथे कोरोना लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:53+5:302021-06-21T04:20:53+5:30
शिबिराच्या सुरुवातीला देवमोगरा मातेच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील संगीता दारासिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरातील लोकांमध्ये लसीकरणाबाबत चुकीचे ...

मोठे उदेपूर मोठे येथे कोरोना लसीकरण शिबिर
शिबिराच्या सुरुवातीला देवमोगरा मातेच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील संगीता दारासिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरातील लोकांमध्ये लसीकरणाबाबत चुकीचे गैरसमज असल्याने शिबिर घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. परंतु मोठे उदेपूर येथील बीएलओ मोगीलाल चौधरी यांनी घरोघरी फिरून लसीकरणाचे महत्त्व समजावून दिले. येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लोकांना लसीकरण करणे आवश्यक असून त्यासाठी गावातील लोकांमध्ये जागृती करण्यात आली. शिबिरासाठी मोठे उदेपूर येथील मुख्याध्यापक व बीएलओ मोगीलाल चौधरी, शिक्षक जोलमा वसावे, रेथी शाळेच्या शिक्षिका रमिला वळवी, शीला नाईक, आरोग्य सेवक फिरोज पिंजारी, परिचारिका कमल तडवी, उपसरपंच दिलीप पाडवी, ग्रामपंचायत सदस्य रामसिंग पाडवी, उदेसिंग पाडवी, सरपंच रवींद्र वसावे, पोलीस पाटील संगीता दारासिंग पाडवी, आशा कार्यकर्ती शर्मिला पाडवी, हिराबाई पाडवी, अंगणवाडी मदतनीस मीना पाडवी, रजनी पाडवी, रेथीचे पोलीस पाटील अरविंद पाडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाडवी, सुनील पाडवी, चांदपूर शाळेचे शिक्षक सुनील आठवले, ग्रा.पं. संगणक कर्मचारी कृष्णा पाडवी, तरुण मंडळी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.