प्रकाशा येथे १४८ व्यापाऱ्यांनी केली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:16+5:302021-06-02T04:23:16+5:30
प्रकाशा गाव कोरोनामुक्त झाल्यानंतर महिनाभरात म्हणजे २६ मे रोजी १७ वर्षीय तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गेल्या पाच ...

प्रकाशा येथे १४८ व्यापाऱ्यांनी केली कोरोना चाचणी
प्रकाशा गाव कोरोनामुक्त झाल्यानंतर महिनाभरात म्हणजे २६ मे रोजी १७ वर्षीय तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गेल्या पाच दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र दक्षता म्हणून प्रकाशा ग्रामपंचायतीतर्फे गावातील व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी घेण्यासाठी येथे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १४८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. शहादा येथील स्वॅब संकलन करणाऱ्या पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक गिरासे, डॉ. आशुतोष माळी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संजय पाटील, प्रकाश नाईक, आरोग्य सेवक नाना कुवर यांनी स्वॅब संकलन केले. सरपंच सुदाम ठाकरे यांच्यापासून चाचणी शिबिरास सुरुवात झाली. ज्यांनी तपासणी केली त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीही निगेटिव्हचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे, असे ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील यांनी सांगितले. शिबिरासाठी सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज चौधरी यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, प्रकाशा येथे मोठी बाजारपेठ असून येथे बाहेरील व्यापारीही व्यवसायासाठी येतात. त्यांचीही कोरोना तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यापारी व सुज्ञ ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे.