कोरोना शहीद आरोग्य कर्मचाऱ्यास ५० लाखांचा विमा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST2021-07-31T04:31:16+5:302021-07-31T04:31:16+5:30
कोविड काळात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिवाची बाजी लावली आहे. त्यातच कोरोना कामे करीत असताना ...

कोरोना शहीद आरोग्य कर्मचाऱ्यास ५० लाखांचा विमा मंजूर
कोविड काळात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिवाची बाजी लावली आहे. त्यातच कोरोना कामे करीत असताना प्रा. आ. केंद्र खापर मधील कोराई उपकेंद्राचे आरोग्यसेवक राजेंद्र सुकलाल माळी यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनामुळे आरोग्य कर्मचारी दगावल्याची नंदुरबार जिल्ह्यातील ही पहिलीच घटना होती. शासनाने कोरोना योद्धयांसाठी पंतप्रधान विमा सुरक्षा कवच योजना सुरू केली. यासाठी जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने पुढाकार घेऊन सर्व कागदपत्र एकत्र करून प्रस्ताव सादर केला. यावर तातडीने निर्णय होऊन पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, स्व. माळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर ५० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विम्याचे कागदपत्र माळी कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते, भूपेंद्रकुमार चौधरी, रियाज सैय्यद, सागर शर्मा, संजय राजपूत उपस्थित होते.