मुंबईहून आलेल्या एस.टी.कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:31 IST2020-11-10T12:29:51+5:302020-11-10T12:31:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मुंबई बेस्टला सेवा दहा दिवसांसाठी गेलेल्या नंदुरबार आगारातील एसटी बस चालक व वाहक परत ...

Corona inspection of ST employees from Mumbai | मुंबईहून आलेल्या एस.टी.कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी

मुंबईहून आलेल्या एस.टी.कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  मुंबई बेस्टला सेवा दहा दिवसांसाठी गेलेल्या नंदुरबार आगारातील एसटी बस चालक व वाहक परत आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी हिंदु सेवा सहाय्य समितीने केली होती. सदरची मागणी दखल घेत नंदुरबार एसटी महामंडळ आगाराने मुंबई येथून परत आलेल्या ६२ कर्मचार्‍यांची कोविड १९ ची तपासणी केली आहे. या तपासणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समिती आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांचे सहकार्य लाभले.
नंदुरबार आगारातील एसटी बस चालक व वाहक हे १० दिवसांसाठी मुंबई येथे बेस्टला सेवा देण्यासाठी   गेले होते. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने खबरदारी म्हणून सेवा बजवून परत आलेल्या नंदुरबार आगारातील वाहक व चालकांची कोरोना तपासणी करण्याची मागणी नंदुरबार येथील हिंदु सेवा सहाय्य समितीने जिल्हाधिकारी आणि नंदुरबार आगाराचे व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली होती. 
या मागणीची दखल घेत परिवहन मंडळाच्या नंदुरबार आगाराने दि.८ नोव्हेंबर रोजी हिंदु सेवा सहाय्य समितीला पत्र पाठवून मुंबई बेस्टवरील कामगिरी करून परत आलेल्या कर्मचार्‍यांची कोरोना तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानुसार आज दि.९ नोव्हेंबर रोजी नंदुरबार आगारात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी खबरदारी म्हणून एकूण ६२ चालक व वाहक कर्मचार्‍यांचे स्वॅब घेण्यात आले. या तपासणीसाठी नंदुरबार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्यसेवक योगेश वसावे, हिना वळवी, रविंद्र बोरस यांचे सहकार्य लाभले. 
याप्रसंगी नंदुरबारचे आगार व्यवस्थापक मनोज पवार यांनी हिंदु सेवा सहाय्य समितीचे पदाधिकारी आणि तालुका आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार केला. कार्यक्रम  यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे पदाधिकारी डॉ.नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, मयुर चौधरी, शेखर कुलकर्णी आणि बस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Corona inspection of ST employees from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.