जिल्हा रुग्णालय ठरतेय कोरोना हॉटस्पॉट केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:05 IST2020-06-27T12:05:10+5:302020-06-27T12:05:17+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालय सध्या कोरोना हॉटस्पॉट बनू पहात आहे. आतापर्यंत रुग्णालयातील २२ ...

Corona Hotspot Center at District Hospital | जिल्हा रुग्णालय ठरतेय कोरोना हॉटस्पॉट केंद्र

जिल्हा रुग्णालय ठरतेय कोरोना हॉटस्पॉट केंद्र


मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालय सध्या कोरोना हॉटस्पॉट बनू पहात आहे. आतापर्यंत रुग्णालयातील २२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. गेल्या दोन दिवसात १७ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोविड कक्षात ड्युटी लावताना कर्मचाऱ्यांना सात दिवस क्वारंटाईन देखील करण्यात येते. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी पॉझिटिव्ह निघत असल्यामुळे एकूणच व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोरोनाला चांगल्या पद्धतीने अटकाव करण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात तसेच इतर सर्वच विभागात आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्याने तेथेदेखील कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नव्हता. परंतु जिल्ह्यात जशी रुग्ण संख्या वाढत आहे तशी जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढत आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे.
वाढत्या ताणामुळे चुका...
जिल्हा रुग्णालयात अद्ययावत कोविड कक्ष उभारण्यात आला आहे. पूर्वी या ठिकाणी मर्यादित स्वरूपात बेड होते नंतर ते वाढविण्यात आले. शिवाय इतरही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे येथून बरे होऊन गेलेले रुग्ण समाधानी होते. परंतु जसे रुग्ण वाढत गेले, बेडची संख्या वाढत गेली तसे या ठिकाणी सुविधा आणि सोयींबाबत तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळेच ड्यूटी लागलेल्या कर्मचाºयांमधील नाराजीचा सूरही वाढू लागला आहे.
कोविड कक्षात रुग्णसंख्या आता जवळपास ८० च्या घरात आहे. त्यामुळे कर्मचाºयांवरील ताण वाढला आहे. शिवाय वरिष्ठांच्याही सूचनांचा भडिमार, प्रसंगी चिडचिड यामुळे कर्मचाºयांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने वेळीच उपाययोजनांवर भर द्यावा. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांना कोरोना लागणमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी व गुरुवारी १७ कर्मचाºयांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली. कर्मचाºयांच्या तक्रारीनुसार मध्यरात्रीपर्यंत त्यांना कुठल्याही अधिकाºयाने सांगितले नाही. दाखल होण्याबाबतही उदासीनता दाखविली गेली. त्यामुळे कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली. कर्मचाºयांना पुरविण्यात येणाºया पीपीई किट तसेच इतर साहित्याच्या दर्जाबाबतदेखील तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत चौकशीचीही मागणी होत आहे. ४कर्मचारी कोरोना बाधित होण्याचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. त्याला कारणे काय? याबाबत चौकशी होऊन त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. कर्मचाºयांच्या मनात भीती निर्माण झाली तर ते काम करण्यास धजावणार नाहीत हे देखील सत्य आहे.
४ड्यूटीवरील कर्मचारी पीपीई किट काढताना आयसोलेशन कक्षाच्या आवारात काढतात. ते काढण्याचीही पद्धत असते. त्याकडे दुर्लक्ष होते किंवा कसे याचाही शोध घेणे आवश्यक आहे. अशा कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले गेले किंवा कसे याचाही तपास व्हावा.
४ड्यूटीवर असताना मोबाईल वापरास बंदी घालावी. कारण मोबाईल वेळोवेळी कानाजवळ आणि तोंडाजवळ जातो. त्यामुळे त्यातून देखील इन्फेक्शन होते किंवा याबाबतही चौकशी करण्यात यावी व तशा सूचना संबंधितांना देण्यात याव्या.
४स्वॅब संकलन केंद्र हे मोकळ्या जागेत असावे. परंतु ते आयसोलेशन कक्षाच्या आवारात आहे. त्यामुळे स्वॅब देण्यासाठी येणारे आयसोलेशनमधून जाऊन ते स्वॅब संकलनमध्ये जातात, त्यामुळे देखील संक्रमणाचा धोका आहे किंवा कसा याचा शोध घेऊन स्वॅब संकलन केंद्र मोकळ्या जागेत हलविणे आवश्यक आहे. कर्मचाºयांची ड्यूटी
कोविड कक्षात कर्मचाºयांची ड्युटी लावताना रुग्णालयातील सर्व विभागातील कर्मचाºयांची ड्युटी लागेल अशा पद्धतीने रोटेशन ठरलेले असते. प्रत्येकी ६ तासांची ड्युटी लावण्यात येते. त्यात डॉक्टर, एक सिस्टर, एक शिपाई, २ स्वच्छता कर्मचारी, रेडिओलॉजिस्ट, एक्सरे तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहायक सहायक यांचा समावेश असतो. रुग्णांच्या संख्येनुसार काही वेळा यात संख्या कमी-जास्त देखील होत असते. एकदा ड्युटी लागल्यावर ती सात दिवसांसाठी असते. साधारणत: २१ दिवसांचे रोटेशनदेखील असते. नवीन भरतीबाबत उदासीनता
जिल्हा रुग्णालयात अशाच पद्धतीने आणि संख्येने कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळत गेले तर कोविड कक्षात काम करण्यासाठी कर्मचाºयांची कमतरता भासणार आहे. त्यामुळे आतापासूनच योग्य नियोजन होणे आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी शासनाकडे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. पूर्वी जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होती. त्यामुळे सद्याचा स्टाफ हा पुरेसा असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता वाढणारी संख्या आणि यापुढेही रुग्ण संख्येतील वाढ लक्षात घेता आतापासूनच वाढीव कर्मचाºयांची गरज शासनाकडे मांडणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव तयार करून तो तातडीने मंजुरीसाठी पाठवावा. नाशिक, जळगावसह इतर जिल्ह्यात अशा प्रकारची भरती पूर्ण झाली आहे. प्रत्येक
कर्मचाºयाचे स्वॅब
कोविड कक्षात ड्युटी असणाºया सर्व कर्मचाºयांचे स्वॅब घेतले जातात. शिवाय क्वारंटाईन देखील केले जाते. स्वॅब निगेटिव्ह आला तर ठीक अन्यथा पॉझिटिव्ह आल्यावर तेथेच त्यांना दाखल करून घेतले जाते. मार्च महिन्यापासून २४ जूनपर्यंत ४०४ कर्मचाºयांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयाील कर्मचारी कोरोना बाधित होण्याचे प्रमाण लक्षात घेता याबाबत चौकशी करण्यात येत आहे. कर्मचाºयांना आवश्यक ते सर्व संरक्षणात्मक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण केला जात आहे. वेळोवेळी स्वॅब घेतले जात आहे. कर्मचाºयांनीही स्वत: काळजी घेणे आवश्यक आहे.
-डॉ.आर.डी.भोये, जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: Corona Hotspot Center at District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.