कोरोनामुळे महिनाभरापासून कुष्ठरोगी तपासणीच्या ओपीडीला लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:39 IST2020-04-30T12:39:36+5:302020-04-30T12:39:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कुष्ठरोगींची नियमित तपासणी करण्याची ओपीडी गेल्या १ महिन्यापासून बंद आहे़ यातून कुष्ठरोगींची परवड ...

Corona has been avoiding leprosy screening OPD for over a month | कोरोनामुळे महिनाभरापासून कुष्ठरोगी तपासणीच्या ओपीडीला लागले टाळे

कोरोनामुळे महिनाभरापासून कुष्ठरोगी तपासणीच्या ओपीडीला लागले टाळे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कुष्ठरोगींची नियमित तपासणी करण्याची ओपीडी गेल्या १ महिन्यापासून बंद आहे़ यातून कुष्ठरोगींची परवड सुरु झाली असून या विभागाला नियमित अधिकारीच नसल्याने ही समस्या सुरु असल्याची माहिती समोर आली आहे़
जिल्हा रुग्णालयात कुष्ठरोगींना नियमित औषधी आणि साहित्य देण्यासाठी ओपीडी चालवली जाते़ याच आवारात असलेल्या कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालकांकडून रुग्णांच्या तपासण्या करुन त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात़ जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहिम राबवून कुष्ठरोगींचे प्रबोधन करण्याचा निरंतर उपक्रम कुष्ठरोग विभागाकडून सुरु आहे़ परंतू गेल्या सहा महिन्यापासून या विभागाचा जिल्ह्यातील कारभार पूर्णपणे थंडावला असून याठिकाणी नियुक्त सहायक संचालकांचा पदभार काढून घेत त्या जागी प्रभारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ संबधित अधिकाऱ्याकडे राजबर्डी ता़ धडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि क्षयरोग केंद्र असे दोन चार्ज असताना पुन्हा कुष्ठरोग कार्यालयाचा भार पडल्याने कामावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे याबाबत कुष्ठरोगींनी तक्रारी करुनही त्यांच्यावर योग्य त्या पद्धतीने उपचार सुरु नसल्याचे समोर आले होते़ दरम्यान कोरोनामुळे ३०० नियमित ओपीडी घेणाºया रुग्णांना घरीच थांबून रहावे लागले आहे़ या रुग्णांना घरपोच औषधे आणि साहित्य पुरवठा करण्याबाबतही कारवाई झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ दरम्यान दरवर्षी रुग्णांना वाटप होणाºया चप्पल आणि इतर साहित्याचे वाटपही रखडले असल्याची माहिती आहे़ कुष्ठरोगींना नियमित उपचार न मिळाल्यास विकृती बळावून त्यांचा आजार बळावण्याची शक्यता आहे़ कुष्ठरोग विभागात नियुक्त असलेले सहायक संचालक, आरोग्य सेवक आणि सेविका हे क्लिनिकल फॅकल्टीत येत असल्याने त्यांना कमीतकमी वेळ कोरोना कक्षांमध्ये थांबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातून मग ओपीडी सुरु होण्याची शक्यता आहे़
दरम्यान कुष्ठरोग विभागाला गेल्या काही दिवसांपासून टाळेच लागत असल्याच्या तक्रारी औषधी आणि साहित्यासाठी भेटी देणाऱ्यांनी केल्या आहेत़ याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे़

Web Title: Corona has been avoiding leprosy screening OPD for over a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.