कोरोनाचा सध्या जिल्ह्यात ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:18 IST2020-06-09T11:17:53+5:302020-06-09T11:18:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संशयीत रुग्णांच्या अहवालांचा देखील त्यात ...

Corona currently has a 'break' in the district. | कोरोनाचा सध्या जिल्ह्यात ‘ब्रेक’

कोरोनाचा सध्या जिल्ह्यात ‘ब्रेक’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संशयीत रुग्णांच्या अहवालांचा देखील त्यात समावेश आहे. दुपारी एकही अहवाल कोरोना तपासणी प्रयोगशाळेत प्रलंबीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सायंकाळी मात्र कर्मचाऱ्यांचे १३ स्वॅब घेण्यात आले. उपचार घेणारे सहा रुग्णांपैकी पाच रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांनाही लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. नवीन रुग्ण देखील चार दिवसांपासून आढळलेला नसल्याने जिल्हावासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव एप्रिलच्या दुसºया आठवड्यापासून सुरू झाला. पहिला रुग्ण नंदुरबार येथे १८ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर शहादा, अक्कलकुवा, विसरवाडी, ता.नवापूर येथे रुग्ण आढळून आले. याशिवाय नाशिक येथे डिटेक्ट झालेले बामखेडा, ता.शहादा आणि सोमावल, ता.तळोदा येथील दोन रुग्णांचा देखील समावेश आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नोंद असलेले ३७ आणि जिल्हाबाहेर आढळलेले दोन असे एकुण ३९ जण कोरोनाबाधीत होते. त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची देखील तपासणी करण्यात आली होती.
१,३९९ जणांची तपासणी
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत तीन महिन्यात १,३९९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ३७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात उपचार घेत आहेत. तर तब्बल १,३५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात आतापर्यंत २११ जणांनी उपचार घेतले आहेत. जवळपास ८२५ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. कोवीड कक्ष आणि जिल्हा रुग्णालयातील एकुण ३१४ जणांचा आतापर्यंत स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
सोमवारी उर्वरित सर्व १३ अहवाल प्राप्त झाले. ते सर्व कोरोना निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सहा जण उपचार घेत असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती चांगली झाली आहे. त्यांचा तिसरा स्वॅब निगेटिव्ह आल्यास त्यांना कोवीड कक्षातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संकट टळलेले नाही
जिल्ह्यात गेल्या चार दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नसला आणि सर्वच अहवाल निगेटिव्ह आले असले तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे. सध्या अनलॉकडाऊन १ सुरू झाले असल्यामुळे बाजार आणि इतर विविध बाबी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. परिणामी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे.
आरोग्य यंत्रणाही समाधानी
कोरोनाचे पाठविलेले सर्व अहवाल निगेटिव्ह येणे, नवीन रुग्ण न आढळणे, नवीन संशयीताचे स्वॅब घेतले न जाणे यामुळे आरोग्य यंत्रणेने देखील आता मोकळा श्वास घेतला आहे. परंतु बाहेरून येणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात आजही धोका कायम आहे. ही बाब लक्षात घेता ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा प्रशासनाला सतर्क ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने व नवीन स्वॅब घेतले न गेल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत अहवालाची वेटींग शून्यावर आली होती.
दुपारी मात्र जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्ष आणि इतर १३ कर्मचाऱ्यांचे नियमित स्वॅब घेतले गेल्याने स्वॅबची वेटींग ही १३ वर आली आहे. त्यांचा अहवालही लवकरच येणार आहे.

Web Title: Corona currently has a 'break' in the district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.