नंदुरबार जिल्ह्यात कोरोना @2000 पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:09 IST2020-08-27T12:09:51+5:302020-08-27T12:09:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजार पार झाला. बुधवारी दिवसभरात एकुण १०४ रुग्ण आढळले. ...

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना @2000 पार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजार पार झाला. बुधवारी दिवसभरात एकुण १०४ रुग्ण आढळले. १८ एप्रिल ते २६ आॅगस्ट या दरम्यान रुग्णसंख्या एवढी झाली. दरम्यान सर्वाधिक रूग्णसंख्या ही नंदुरबार तालुक्यानेही हजाराचा टप्पा पार केला आहे. त्या खालोखाल शहादा तालुक्याचा क्रमांक लागतो.
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या गेल्या महिन्यापासून वाढतच चालली आहे. जुलै ते २६ आॅगस्ट दरम्यान तब्बल सव्वा हजार रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यूंची संख्या देखील याच काळात वाढली आहे.
जिल्ह्यात पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर रुग्ण संख्या जून महिन्याच्या मध्यापर्यंत कमी राखण्यात यश मिळाले होते. अर्थात या काळात चाचण्या देखील कमी झाल्या होत्या. गेल्या महिन्यापासून रुग्ण संख्येत मात्र वाढ होण्यास सुरुवात झाली ती कायम आहे. रुग्ण वाढीचा वेग हा चारपट झाला आहे. सामुहिक संसर्गाचा धोका आता यातून निर्माण झाला आहे. शहरी भागासह आता ग्रामिण भागात देखील कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या आठवड्यापासून एका दिवसात सरासरी ७० ते १०० रुग्ण आढळून येत आहे. सर्वाधिक रुग्ण नंदुरबार तालुक्यात आहेत. तालुक्यानेही हजाराचा टप्पा पार केला आहे. तालुक्यात मृत्यू ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यात ६०० रुग्णांचा टप्पा देखील पार केला आहे. तालुक्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तळोदा व नवापूर तालुक्यानेही २०० चा टप्पा पार करीत कोरोना रुग्ण संख्या वाढ झाली आहे.
दरम्यान, नंदुरबारात आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्याने आणि खाजगी रुग्णालयांमध्ये देखील उपचार सुरू करण्यात आल्याने स्वॅब संकलन वाढले आहे.