उपलब्ध औषधांनीच करता येईल कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:06 IST2020-05-17T13:06:05+5:302020-05-17T13:06:11+5:30

संडे स्पेशल मुलाखत सध्या आहे त्या उपचार पद्धतीनेच कोरोनाचा सामना करता येईल. रसायनशास्त्राचा धातू धनभारीत पद्धतीचा अवलंब करता येईल- इंदिरा राजपू

Corona can be overcome with the help of available medicines | उपलब्ध औषधांनीच करता येईल कोरोनावर मात

उपलब्ध औषधांनीच करता येईल कोरोनावर मात


मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भारतातच उपलब्ध असणाऱ्या मान्यताप्राप्त औषधांनी कोरोना आटोक्यात येवू शकतो असा दावा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ इंदिरा जितेंद्रसिंह राजपूत यांनी केला आहे. त्यांचा प्रबंध इंटरनॅशनल इंटरडीसीप्लीनरी रिसर्च जर्नल या आंतरराष्ट्रीय जर्नलने आॅनलाईन प्रसिद्ध केला आहे. त्यांच्याशी साधलेला संवाद.
कोरोना विषाणूचे कवच भेदले का जात नाही?
सध्या भारतात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी फक्त प्रतिविषाणू औषध (अँटीव्हायरल) द्वारे कोरोना आजारावर उपचार करण्यात येतात. सदर उपचारामुळे कोरोना विषाणूचे कवच भेदण्यात मयार्दा येतांना दिसत आहेत. प्रबंधात कोरोना विषाणूच्या मेदाच्या कवचावर काही विशिष्ठ औषधांची अभिक्रिया करुन मेदाचे कवच तोडता येवू शकते. कवच भेदल्यानंतर प्रथिने शिल्लक राहतात. या प्रथिनांवर अँटीव्हायरल औषधे परिणामकारक ठरु शकतील. कोरोनाच्या मेदाचे कवच भेदण्यासाठी जी औषधे वापरली जात आहेत त्यासोबत प्रतिविषाणू औषधे (अ‍ॅन्टीव्हायरल ड्रग) वापरली गेली तर कोविड-१९ वर फायदेशीर ठरु शकते.
आपल्याकडे या औषधी उपलब्ध आहेत का?
सर्व औषधे भारतात आधीच उपलब्ध असून मान्यताप्राप्त आणि सुरक्षीत व त्यासोबत सहज उपलब्ध असणारे आहेत. या उपचार पध्दतीत कोणत्याही नवीन औषधांचा पर्याय सुचविण्यात आलेला नाही. तर प्रतिजैविक सोबत द्यावयाची औषधांचा संयोग कसा असावा यावर भर देण्यात आला आहे.
प्रबंधाला मानांकन मिळाले का?
इंटरनॅशनल इंटरडीसीप्लीनरी रिसर्च जर्नल या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या १२ मे रोजी आॅनलाईन प्रसिध्द झालेल्या ताज्या आवृत्तीत शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे. सदर जर्नलला ६.३ इतके मानांकन प्राप्त आहे.


साधारणत: अशा संशोधनासाठी दिड ते अडीच वर्षाचा काळ लागतो. मात्र कोविड-१९ ची भयावहता आणि जगाला घातलेला विळखा या पार्श्वभूमीवर इंदिरा राजपूत यांनी महिनाभराच्या अभ्यासातून विस्तृत प्रबंध सादर केला आहे.


आणखी संशोधन करणार...
राजपूत या आॅरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. झाल्या असून डीएमएलटी देखील केले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शोधनिबंध आंतरराष्टÑीय स्तरावर प्रसिद्ध होताच अनेक अभ्यासकांनी त्यांच्याशी संवाद साधून या उपचार पद्धतीबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून नंदुरबारचे नाव आंतरराष्टÑीय पातळीवर झळकले आहे. येथेच न थांबता आपण आणखी संशोधन करणार असून या उपचार पद्धतीला पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Corona can be overcome with the help of available medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.