तळोदा येथे कोरोना व लसीकरण आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:21+5:302021-05-27T04:32:21+5:30
तळोदा तालुक्यातील कोरोना आपत्ती व्यवस्थापन व लसीकरण आढावा नियोजन आदी बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी तालुक्यातील सरपंच, प्रशासक यांची बैठक ...

तळोदा येथे कोरोना व लसीकरण आढावा बैठक
तळोदा तालुक्यातील कोरोना आपत्ती व्यवस्थापन व लसीकरण आढावा नियोजन आदी बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी तालुक्यातील सरपंच, प्रशासक यांची बैठक बुधवारी घेण्यात आली. बैठकीला या वेळी पंचायत समिती सदस्य यशवंत ठाकरे, सदस्य दाज्या पावरा, सोनीबाई पाडवी, तहसीलदार गिरीश वखारे, गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण उपस्थित होते.
शाहूराज मोरे यांनी कोरोना आजाराबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या, विलगीकरण, वेळेत उपचार, लसीकरण इत्यादीबाबत माहिती दिली. कोरोना आजार व लसीकरणाबाबत गैरसमज, बोगस डॉक्टर इत्यादींपासून जनतेस परावृत्त करण्याचे आवाहन केले.
तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी लसीकरणाबाबत तालुक्यातील प्रगती, लसीकरण केंद्रे, गावनिहाय नियोजन व लसीकरणाचे महत्त्व याबाबत माहिती दिली. सभापती यशवंत ठाकरे यांनी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी पुढाकार घेऊन गावोगावी लसीकरण कॅम्प आयोजित करण्याचे आवाहन केले. पंचायत समिती सदस्या सोनीबाई पाडवी यांनी बचत गटातील महिलांना सोबत घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन ग्रामसेवक मुकेश कापुरे यांनी केले.