अखिल भारतीय गुजर महासभेचे बारडोली येथे अधिवेशन व पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:26+5:302021-03-16T04:31:26+5:30

बारडोली येथील आर.एन.जी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या भव्य सभागृहात अखिल भारतीय गुजर महासभेचे अधिवेशन व गुजरात राज्य कार्यकारिणीचा पदग्रहण ...

Convention and inauguration of All India Gujar Mahasabha at Bardoli | अखिल भारतीय गुजर महासभेचे बारडोली येथे अधिवेशन व पदग्रहण

अखिल भारतीय गुजर महासभेचे बारडोली येथे अधिवेशन व पदग्रहण

बारडोली येथील आर.एन.जी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या भव्य सभागृहात अखिल भारतीय गुजर महासभेचे अधिवेशन व गुजरात राज्य कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा झाला. यावेळी दीपक पाटील बोलत होते. व्यासपीठावर महासभेचे महासचिव आमदार बच्चूसिंह बैसला, हरियाणा प्रदेश अध्यक्ष प्रेमकृष्ण आर्य, राष्ट्रीय सचिव सुंदर चौधरी, मध्यप्रदेशचे अध्यक्ष राजेंद्रसिंह गुजर, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार गोपीचंद गुजर, संघटन महामंत्री महेंद्रभाई पटेल, गुजरातचे प्रदेश अध्यक्ष मोहनभाई पटेल, कार्याध्यक्ष जगदीशभाई पटेल, राष्ट्रीय सचिव मणिलाल पटेल, दीपक बैसला, नरेश नेताजी, डॉ. प्रियांका पाटील, गुजरात महिला अध्यक्षा नीता पटेल, कंचन पटेल, निर्मला पाटील, अंबुल चौधरी यांच्यासह विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुजरातच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा झाला. दीपक पाटील यांनी समाजाचे संघटन मजबूत करण्यासंदर्भात व सामाजिक कार्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आमदार बच्चूसिंह बैसला यांनी सांगितले की, गुजर महासभेची स्थापना १९०८ मध्ये झाली. या १०० वर्षांत सर्वाधिक काळ म्हणजे ३२ वर्षे स्व. पी. के. अण्णा पाटील हे अध्यक्ष म्हणून राहिले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महासभेची बांधणी झाली असून त्यांच्या नेतृत्वाचा काळ हा सुवर्णकाळ होता. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर महासभा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गुजरातचे कार्यकारी अध्यक्ष जगदीशभाई पटेल यांनी केले. गुजरात प्रदेश अध्यक्ष मोहन पटेल यांनी अधिवेशनाची भूमिका मांडली. सूत्रसंचालन आर.एन.जी. पटेल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य व गुजरात कार्यकारिणीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. लतेश चौधरी यांनी केले.

यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी स्वतंत्र सत्र घेऊन विविध उपक्रम व स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला. तसेच गुजरातमधील युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आठ संघात क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. त्याचेही बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Convention and inauguration of All India Gujar Mahasabha at Bardoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.