अखिल भारतीय गुजर महासभेचे बारडोली येथे अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:47+5:302021-03-09T04:34:47+5:30
अखिल भारतीय गुजर महासभेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यात गुजरात राज्यातील नूतन पदाधिकारी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. ...

अखिल भारतीय गुजर महासभेचे बारडोली येथे अधिवेशन
अखिल भारतीय गुजर महासभेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यात गुजरात राज्यातील नूतन पदाधिकारी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने गुजरात राज्यातील तरुणांसाठी विविध आठ संघांची क्रिकेट स्पर्धा होणार आहे. तसेच सकाळी १० ते साडेबारा वाजेदरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दुपारी दोन ते चार या वेळेत अखिल भारतीय गुजर महासभा व गुजरात प्रदेश कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा होईल. दुपारी चार वाजता क्रिकेट स्पर्धेसह विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम बारडोली येथील आर.एन.जी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात होणार असल्याची माहिती गुजरात प्रदेशचे अध्यक्ष व व्हीएसजीएमचे अध्यक्ष मोहनभाई पटेल यांनी दिली.