चुल आणि मुल पलिकडे आता प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:53 IST2020-03-08T21:52:31+5:302020-03-08T21:53:25+5:30

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : केवळ चूल आणि मुल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ...

The contribution of women has increased in every field beyond Chul and Mul | चुल आणि मुल पलिकडे आता प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले

चुल आणि मुल पलिकडे आता प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले

सुनील सोमवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : केवळ चूल आणि मुल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ही चौकट मोडून सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहादा तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीपासून ते गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनगराध्यक्षा अशा अनेक मोठ्या पदांवर महिला आपल्या कर्तुत्वाने पोहोचल्या आहेत.
शिक्षण, आरोग्य, समाजकारण, अर्थकारण, कला, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. शहादा तालुक्यात तब्बल ८०० महिला शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. ८१९ महिला राजकीय क्षेत्रात (ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आदी.) कार्यरत असून, तालुक्याच्या विकासाला हातभार लावीत आहेत.
शहाद्याचा कायदा व सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी असणाऱ्या पोलीस विभागात एक महिला अधिकारी व चार महिला पोलीस आहेत तर शहादा न्यायालयात सात महिला वकील न्याय मिळवून देण्यासाठी आपले कसब पणाला लावीत आहेत. तालुक्यातील आर्थिक व्यवस्था सांभाळणाºया विविध बँका आणि पतसंस्थांमध्ये सुमारे ३५ ते ४० महिला अधिकारी व कर्मचारी सेवा देत आहेत. तर सुमारे २५ महिला डॉक्टर आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या शहादा आगारात १४ महिला वाहक, चार महिला लिपिक व तीन महिला स्वच्छता कर्मचारी आहेत. याशिवाय तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पोस्ट अशा सर्वच कार्यालयात महिला मोठ्या संख्येने कार्र्यत आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागातून सुमारे सहा हजार सावित्रीच्या लेकी शिक्षणासाठी एस.टी. ने अपडाऊन करतात. शहरात मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र दोन कन्या विद्यालय व दोन महिला महाविद्यालये आहेत. महिलांना बचतीची सवय लागावी आणि अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे म्हणून स्वतंत्र महिला पतसंस्था आहे. या पतसंस्थेत सर्व सदस्य आणि संचालकदेखील महिला आहेत. तालुक्याच्या राजकारणातही महिला मागे नाहीत. तालुक्यात ७०४ महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत. पैकी ७२ महिला सरपंचपदावर विराजमान आहेत. यात पुरूषोत्तमनगर ग्रामपंचायतीत सर्व सदस्य महिलाच असल्याने तेथे खºया अर्थाने महिला राज आहे. पंचायत समितीत १६ महिला तर जिल्हा परिषदेत तालुक्यातील १० महिला सदस्य आहेत. शहादा नरपालिकेत १७ महिला नगर सेविका आहेत.


शहादा तालुक्याच्या नायब तहसीलदार म्हणून संध्या देवळे कार्यरत आहेत. तालुक्याचे मिनी मंत्रालय ठरणाऱ्या शहादा पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा बायजाबाई भिल यांच्याकडे आहे. तर तालुक्याच्या शिक्षणाचे नियोजन सांभाळणाºया गटशिक्षणाधिकारीपदाची धुरा उषाबाई पेंढारकर यांच्याकडे आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाºया पोलीस विभागात योगिता पाटील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शहादा शहराच्या उपनगराध्यक्षपदाची धुरा रेखाबाई चौधरी समर्थपणे सांभाळत आहेत. या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या पदांवर सावित्रीच्या या लेकी आपले कसब पणाला लावून तालुक्याच्या विकासातील आपले योगदान देत आहेत.

Web Title: The contribution of women has increased in every field beyond Chul and Mul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.