कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:22 IST2019-09-08T12:22:07+5:302019-09-08T12:22:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाणीपुरवठा व स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचा:यांनी बेमुदत काम बंद केले असून ...

कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाणीपुरवठा व स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचा:यांनी बेमुदत काम बंद केले असून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात स्वच्छ भारत अभियान मोठय़ा प्रमाणात राबविले जात आहे. या कामात महाराष्ट्र शासनाने देशपातळीवर विविध पुरस्कार घेत देशात महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. स्वच्छतेची चळवळ ग्रामीण भागातून राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागअंतर्गत ‘वासो’ संस्थेकडून प्रत्येक जिल्हा परिषदअंतर्गत पंचायत समितीत गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) स्थापन करण्यात आले आहे. यात काम करणारे कंत्राटी गटसमन्वयक, समूह समन्वयक कार्यरत आहेत. परंतु त्यांना अतिशय कमी आठ हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. गेल्या सात वर्षात स्वच्छतेच्या, जाणीव जागृती, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, संत गाडगेबाबा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम, सार्वजनिक पिण्याचे पाणी गुणवत्ता स्त्रोतांचे मूल्यमापन, शौचालय वापराबाबत जनजागृती, स्वच्छता दर्पण असे विविध कार्यक्रम हे कर्मचारी यशस्वीपणे राबवत असतानाही केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत कंत्राटी कर्मचा:यांची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. यामुळे महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीत कार्यरत कंत्राटी कर्मचा:यांनी शासनाचे लक्ष वेधत आपल्या समस्या सोडवण्यासाठी 4 सप्टेंबरपासून संपाचे हत्यार उपसले आहे.
गटसमन्वयक व समूह समन्वयक यांना अनेक जिल्ह्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात चार-पाच महिन्यापासून मानधन मिळत नाही तर काही ठिकाणी अकरा महिन्यांची ऑर्डर संपूनही नवीन ऑर्डर मिळालेल्या नाहीत. यामुळे अल्प मानधनात काम करत असताना पंचायत समितीस्तरावरून गावपातळीवर फिरण्यासाठी त्यांना काही अपघात झाला तर कुठलाही अपघाती विमा किंवा उपचारासाठी आरोग्य विमा लागू नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. शासनामार्फत राबविल्या जाणा:या इतर योजनांतील कंत्राटी कर्मचा:यांना मिळणा:या मानधनप्रमाणे मानधन मिळावे यासाठी शासनस्तरावर आजवर कुठलाही मानधनाबाबत निर्णय होत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेमार्फत पंचायत समितीत काम करणारे कंत्राटी कर्मचारी 4 सप्टेंबरपासून राज्यभरातून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मानधन वाढ मिळावी, वेळेवर मानधन मिळावे, अपघाती व आरोग्य विमा लागू करावा, सेवेत कायम करावे अशा विविध मागण्या घेऊन राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.