नंदुरबारात कंत्राटी आरोग्य कर्मचा:यांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:12 IST2018-04-12T13:12:16+5:302018-04-12T13:12:16+5:30
आरोग्य सेवेवर परिणाम : साडेनऊशे कर्मचारी सहभागी

नंदुरबारात कंत्राटी आरोग्य कर्मचा:यांचे काम बंद
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 12 : राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचा:यांनी विविध मागण्यांसाठी बुधवार, 11 एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास 950 कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे.
याबाबत राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान, अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी कर्मचा:यांची पुनर्रनियुक्ती करतांना यापुढे केवळ सहा महिन्यासाठीच नियुक्ती ठेवण्याचा नवीन फतवा आरोग्य सेवा संचालनालयाने काढला आहे. पुनर्रनियुक्ती देण्याकरीता कामावर आधारीत मार्क सिस्टिम तयार केली आहे.
या बदललेल्या पुनर्रनियुक्ती प्रक्रियेमुळे मोठय़ा प्रमाणावर कंत्राटी कर्मचा:यांची पिळवणूक होणार आहे. कामावर आधारीत मार्क सिस्टिम जाचक असून जे काम कंत्राटी कर्मचा:यांच्या जॉबचार्टमध्ये नाही त्यास त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
पुनर्रनियुक्ती प्रक्रियेमध्ये झालेला अन्यायकारक बदल तसेच संघटनेच्या विविध प्रलंबीत मागण्यांकरीता संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा देखील संघटनेतर्फे करण्यात आला आहे.