शहादा तालुक्यातील नऊ गावांना दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:04 IST2020-08-07T12:50:24+5:302020-08-07T13:04:33+5:30

हितेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रूपये खर्च केले ...

Contaminated water to nine villages in Shahada taluka | शहादा तालुक्यातील नऊ गावांना दूषित पाणी

शहादा तालुक्यातील नऊ गावांना दूषित पाणी

हितेश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रूपये खर्च केले जात असले तरी अद्यापही अनेक गावात गावांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. शहादा तालुक्यात १५० ग्रामपंचायती आहेत. त्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची तपासणी केली असता १४१ ग्रामपंचायतींना पिण्यायोग्य पाणी असल्याने हिरवे कार्ड तर नऊ गावातील पिण्याचे पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आल्याने या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. सुदैवाने तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीकडे लाल कार्ड नाही. दूषित पाणीपुरवठा करणाºया ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाºया स्रोतांचे पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. हा अहवाल नुकताच आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील १५० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतीचे पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त आहे. तर १४१ ग्रामपंचायतींना पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे अहवालावरून निष्पन्न झाले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साथीचे आजार पसरू नये याकरिता ग्रामपंचायतींकडून टीसीएल पावडरचा वापर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात शुद्ध पाणी मिळण्यासाठी फिल्टरचे पाणी पैसे मोजून विकत घ्यावे लागत आहे तर काही ग्रामस्थांची परिस्थिती पाहता पाण्याच्या जार विकत घेणे सर्वसामान्यांना परवडत नसून, ग्रामपंचायतीच्या पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागते. ग्रामपंचायतीकडून होणाºया दूषित पाणीपुरवठ्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांच्या नशिबी आजारपण येत असते. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावातील पिण्याच्या पाण्यात टीसीएल पावडर वापरत नसल्याचा प्रकार अनेकदा समोर येत असतो. आजही अनेक ठिकाणी नियमित टीसीएल पावडरचा वापर होत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात दूषित पाण्याचे प्रमाण वाढण्याची अधीक शक्यता असते. त्यामुळे साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यताही वाढते. या काळात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी दूषित पाण्याची समस्या मिटलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोका कायम असतो.

संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाण्याचे नमुने घेऊन पाण्याचा दर्जा ठरविण्यात येतो. त्यात पाण्याच्या दर्जानुसार संबंधित ग्रामपंचायतीला लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये अतिदूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे त्या ग्रामपंचायतीला लाल, कमी दुषित पाण्याचा पुरवठा करणाºया ग्रामपंचायतीला पिवळे तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाºया ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड देण्यात येते.

शहादा तालुक्यातील काहाटूळ, धांद्रे बुद्रूक, उभादगड, चिरखान, शहाणा, वडगाव, कोळपांढरी, टेंभली (आसूस), कुरंगी या नऊ ग्रामपंचायतींकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.

Web Title: Contaminated water to nine villages in Shahada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.