सुरत राष्ट्रीय महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:10 PM2020-09-24T12:10:53+5:302020-09-24T12:11:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा येथे समोरून येणाऱ्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर नदीच्या पुलावरून ...

The container collapsed off the bridge | सुरत राष्ट्रीय महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला

सुरत राष्ट्रीय महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा येथे समोरून येणाऱ्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर नदीच्या पुलावरून चाळीस फूट खाली कोसळला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे.
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धुळ्याकडून नवापूर मार्गे सिल्वासा कडे कंटेनर (क्रमांक एनएल ०१ एल ७४२५)े जात असताना तालुक्यातील पानबारा येथील नदीच्या पुलावरून नवापूर कडून धुळ्याकडे जाणाºया एसटी बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर पुलावरून सराई नदीच्या पात्रात थेट चाळीस फूट खाली कोसळले.
या अपघातात चालक अभिजीत जखमी झाला आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच कोंडाईबारी घाटातील पोलीसमदत केंद्रावरील पोलिस कर्मचारी अपघात स्थळी दाखल झाले.
याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विसरवाडी पोलिस करीत आहे.
दरम्यान, धुळे सुरत महामार्गाची विसरवाडी ते कोंडाईबारी घाटादरम्यान मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरपावसात संबंधित विभागाकडून बुजवले जात आहेत. मात्र महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. शासनाचा महामार्ग दुरुस्तीसाठी असलेला पैसा खड्ड्यात जात असल्याचे वेळोवेळी झालेल्या अपघातातून सिद्ध झाले आहे.

Web Title: The container collapsed off the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.