तळवे येथील अमरधामचे बांधकाम निधीअभावी रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:21+5:302021-03-07T04:28:21+5:30
तळवे येथील गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी नवनाथ ठाकरे, मोग्या भील, सुपड्या पाडवी यांनी केली होती. त्यांनी ...

तळवे येथील अमरधामचे बांधकाम निधीअभावी रखडले
तळवे येथील गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी नवनाथ ठाकरे, मोग्या भील, सुपड्या पाडवी यांनी केली होती. त्यांनी कामातील अनियमितता व हलगर्जीमुळे काम रेंगळल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांच्याकडे केली होती. त्यानुसार सावित्री खर्डे यांनी चौकशी समिती नेमली आहे. ही समिती ९ मार्च रोजी प्रत्यक्ष ग्रामपंचायतीला भेट देणार आहे. दरम्यान, मंगळवारी देखील गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी पंचायतीचे दप्तर तपासले. त्यात कुठल्याही त्रुटी आढळून आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
तळोदा तालुक्यातील तळवे येथील ग्रामपंचायतमार्फत बांधण्यात आलेल्या स्मशाभूमीच्या बांधकामाबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्याची चौकशीकरिता विस्तार अधिकारीची नियुक्ती केली आहे. तसा अहवाल तातडीने देण्याची सूचना केली आहे.
- सावित्री खर्डे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती तळोदा.
ग्रामपंचायतीमार्फत गावात स्मशानभूमीचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्यावर्षीपासून काम रखडलेले आहे. कोणाच्या हलगर्जीपणामुळे काम थांबलेले आहे. याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे. त्याकरिता आम्ही बी. डी. ओ. कडे तक्रार केली आहे.
-नवनाथ ठाकरे,ग्रामस्थ,तळवे