विधीसेवा प्राधिकरणतर्फे नंदुरबारात संविधान सप्ताह जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:13 PM2020-01-17T12:13:50+5:302020-01-17T12:13:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा विधिसेवा प्राधिकरणतर्फे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. ििजल्हा व सत्र ...

Constitution Week awareness rally in Nandurbar | विधीसेवा प्राधिकरणतर्फे नंदुरबारात संविधान सप्ताह जनजागृती रॅली

विधीसेवा प्राधिकरणतर्फे नंदुरबारात संविधान सप्ताह जनजागृती रॅली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा विधिसेवा प्राधिकरणतर्फे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. ििजल्हा व सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव सतिष मलीये, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, शिक्षण निरिक्षक दिनेश देवरे उपस्थित होते. रॅली नेहरू चौक, हाट दरवाजा, कपडा बाजार, जुनी नगरपालिका, अंधारे चौक , मार्गे हि.गो. श्रॉफ महाविद्यालयात नेण्यात आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्राचार्या सुषमा शहा, उपमुख्याध्यापक राजेश शहा, प्रा. चंद्रकांत सोनवणे, विधी प्राधिकरणाचे अधीक्षक चंद्रकांत धाकड, बी.एन.सोनवणे, राजेद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
समारोपप्रसंगी हि.गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे भारताचे संविधान व मूलभूत कर्तव्ये याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश पाटील तर आभार प्रा. प्रशांत बागुल यांनी मानले. या जनजागृती रॅलीत एकलव्य कनिष्ठ महाविद्यालय, कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, दुर्गाबाई रघुवंशी कनिष्ठ महाविद्यालय, हि.गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Constitution Week awareness rally in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.