अक्कलकुव्यात मोरांचा वावर वाढल्याने चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:18 IST2020-06-27T12:18:24+5:302020-06-27T12:18:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील पोलीस लाईन तसेच इतर भागात दररोज सकाळ आणि सायंकाळ मोरांचे आगमन होत आहे़ ...

अक्कलकुव्यात मोरांचा वावर वाढल्याने चैतन्य
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरातील पोलीस लाईन तसेच इतर भागात दररोज सकाळ आणि सायंकाळ मोरांचे आगमन होत आहे़ पावसाची चाहूल लागल्यानंतर पिसारा फुलवत थुईथुई नाचणाऱ्या मोरांना पाहून नागरिकांमध्येही चैतन्य निर्माण होत आहे़ दररोजचे हे दृश्य पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत आहेत़
शहरातील गल्लीबोळात अत्यंत निर्भिडपणे वावरुन नागरिकांचे लक्ष वेधणाºया मोरांना पाहून नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्याच्या ओळी गुणगुणल्या जात आहेत़ पोलीस लाईन मागील भागातील परिसरात येणारे हे मोर शहरातील इतर भागातही विहार करत आहेत़ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वनक्षेत्रातून येणाºया या मोरांचा वावर प्रामुख्याने अन्न आणि पाण्याच्या शोधात सुरु झाला असावा असा अंदाज आहे़ अक्कलकुवा शहरालगतच्या शेतशिवारात छोटे मोठे कीटक आणि पाणी मुबलक प्रमाणात असल्याने मोरांचा येथे रहिवास वाढत आहे़ यातून मोर शहरी वसाहतींमध्येही दिसून येत आहे़ संख्या वाढणाºया या पक्ष्यांना कोणताही अपाय आजवर नागरिकांकडून करण्यात आलेला नाही़ याउलट नागरिक घराबाहेर येऊन मोरांचे पिसारा फुलवण्याचे मनोहारी दृश्य पाहून त्यात रमत आहेत़
अक्कलकुवा शहरालगतची शेतशिवार तसेच गुजरात हद्दीतील गावांमध्ये मोठ्या संख्येने मोर आढळून येतात़ सातपुड्याच्या विविध भागातही मोरांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे़ मोठ्या संख्येने वाढीस लागणाºया या पक्ष्याची शिकार होण्याची शक्यता अधिक असल्याने वनविभागाने दक्षता घेण्याची अपेक्षा नागरिकांची आहे़