निझर येथे काँग्रेसचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:44 IST2020-02-03T12:44:12+5:302020-02-03T12:44:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील निझर येथे गुजरात राज्य काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमित चावडा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे ...

Congress rally in Nizar | निझर येथे काँग्रेसचा मेळावा

निझर येथे काँग्रेसचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरात राज्यातील निझर येथे गुजरात राज्य काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमित चावडा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी चावडा यांनी भाजप सरकारवर टीका करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़
मेळाव्यात व्याराचे आमदार पुनाजीभाई गामीत, मांडवीचे आमदार आनंदभाई चौधरी, निझरचे आमदार सुनीलभाई गावीत, तापी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भिलाभाई गावीत, गुजरात प्रदेश काँग्रेसचे भरत पटेल, तापी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रमण साळवे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाडवी, महामंत्री जगदीश पटेल, अजबसिंग वसाव, भानुदास पाडवी, वेडूभाई पाटील, किरण पटेल, सुभाष पटेल, विजय वळवी, सतीष वळवी, दिनेश पाडवी, हिरालाल गुरव, अनिता पाडवी यांच्यासह तापी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी सांगितले की, गुजरातमधील भाजप सरकार शेतकरी, मजूर, गोरगरीब आदिवासी जनतेवर अन्याय करत आहे़ त्यांना जनतेची चिंता नाही़ निझर तालुक्याचे प्रश्न सरकारदरबारी वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत़ वेळ आल्यावर काँग्रेसकडून आंदोलन करण्याची तयारी आहे़ ताुलक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे ते शेवटी म्हणाले़
महामंत्री जगदीश पटेल यांनी निझर तालुक्यातील उपसा सिंचन, आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली़

Web Title: Congress rally in Nizar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.