पालकमंत्री पाडवींच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:04 IST2020-10-21T21:04:38+5:302020-10-21T21:04:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा काँग्रेस कमीटीची बैठक आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे ...

पालकमंत्री पाडवींच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा काँग्रेस कमीटीची बैठक आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीत उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि तालुकाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमास माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, सभापती निर्मला राऊत, सभापती रतन पाडवी, जिल्हा परीषद सदस्य सी.के.पाडवी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हारसिग पावरा, पंडीतराव पवार, रविंद्र पाडवी, सिताराम राऊत, देवा भाऊ चौधरी, इकबाल भाई, ओ.बी.सी.सेल अध्यक्ष योगेश चौधरी, मुकूंद रामराजे, भास्कर पाटील, राजेंद्र पाटील,अमर वळवी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा उपाध्यक्षपदी देवमन तेजमल पवार, विक्रम नुर्या पाडवी, रतनजी बुखल्या गावीत, ॲड. सीमा पद्माकर वळवी, जिल्हा सरचिटणीसपदी पंडीत पांडुरंग पवार, हारसिंग मल्ल्या पावरा, सुहास वेच्या नाईक, रविंद्र मानसिंग पाडवी, किशोर प्रकाश पाटील, राजेंद्रप्रसाद अग्रवाल यांची तर नवापूर तालुकाध्यक्षपदी जालमसिग काथुड्या गावीत, धडगाव रेहंज्या कुठल्या पावरा, अक्कलकुवा मंगलसिग कोमा वळवी, तळोदा रोहीदास शामा पाडवी, शहादा डाॅ. सुरेश सुमेरसिग नाईक यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष दिलीप नाईक आणि सुभाष पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.