तळोदा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:27+5:302021-01-19T04:33:27+5:30
विजयी उमेदवार - नर्मदानगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक वसावे केवलसिंग चांदया, अनिता मिठ्या वसावे, प्रभाग दोनमध्ये पुण्या ढेमश्या वसावे, ममताबाई ...

तळोदा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
विजयी उमेदवार - नर्मदानगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक वसावे केवलसिंग चांदया, अनिता मिठ्या वसावे, प्रभाग दोनमध्ये पुण्या ढेमश्या वसावे, ममताबाई केवलसिंग पाडवी, वसंतीबाई विलीन वसावे, प्रभाग तीन वसावे विलास बावा, वसावे दोगिबाई पुण्या, पाडवी इराबाई रमन्या, प्रभाग चार पाडवी दिलीप ठोग्या, पाडवी विजय लालजी, पाडवी रिता तेजला हे विजयी झाले.
बंधारा ग्रामपंचायतीत प्रभाग एकमध्ये पाडवी विजसिंग कोमा, पाडवी सुनिता विजयसिंग, प्रभाग दोनमध्ये पाडवी दारासिंग झुंजाऱ्या, पाडवी रिना नामदेव, पाडवी सविता साकऱ्या प्रभाग तीनमध्ये ठाकरे मधुकर कर्मा, ठाकरे अंजुबाई नितीनकुमार हे विजय झाले.
पाडळपूर ग्रामपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक एकमध्ये ठाकरे सुरुपसिंग धनसिंग, ठाकरे ज्योती नवलसिंग, ठाकरे सुमित्राबाई सुरुपसिंग, प्रभाग क्रमांक दोनमध्ये वळवी उत्तमसिंग कुवरसिंग, पाडवी सखुबाई मोतीराम, मोरे मनीषा सुरेश, प्रभाग क्रमांक तीनमध्ये ठाकरे देवीलाल भामटा, ठाकरे भंगूबाई देवीलाल, वळवी नम्रता अमित हे विजयी झाले.
राणीपूर ग्रामपंचायतीतून प्रभाग एकमध्ये ठाकरे दिनेश आरसिंग, वळवी प्रकाश आमश्या, वसावे निर्मला सुरसिंग, प्रभाग क्रमांक दोनमध्ये डोंगरे अजय ओंकार, डोंगरे सरिता सचिन, वसावे नूतन बादलसिंग, प्रभाग तीन वळवी आनंद नवलसिंग, वसावे सोनी किरण, वळवी सुशीलाबाई सांगदेव हे विजयी झाले.
रोझवा पुनर्वसन ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये प्रभाग पावरा विजय जोरदार, पावरा भरतसिंग दाजला, पावरा एमना हारसिंग, प्रभाग दोनमध्ये बालगीर पुण्या वसावे, पावरा वर्षा दिनेश, वसावे दिलमा वजाऱ्या प्रभाग तीनमध्ये पाडवी सरदार पाडक्या, तडवी वंती उदेसिंग, पावरा भारती मैज्या हे विजयी झाले.
रेवानगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये पावरा हिरालाल जंगल्या, पावरा शकीला दुलबा, प्रभाग दोन पावरा दिलीप पोड्या, पावरा मोलगी जायला, पावरा सुनिता जंजाड्या, प्रभाग तीनमध्ये पावरा शिवाजी चुंड्या, पावरा निशा आपसिंग, पावरा संगीता चिमा प्रभाग चारमध्ये पावरा पिंट्या दोहण्या, पावरा तेरसिंग मालसिंग, पावरा वंदना बटेसिंग हे विजयी झाले.
सरदारनगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधून तडवी रमेश रोता, तडवी कविताबाई रमेश प्रभाग दोनमध्ये पाडवी भीमसिंग पानक्या, पाडवी इंदिरा गुलाबसींग, तडवी शर्मिला सीताराम, प्रभाग क्रमांक तीनमध्ये पाडवी विजय जात्र्या, तडवी सुनिताबाई दाजला हे विजयी झाले आहेत.
दरम्यान, याबाबत माजीमंत्री ॲड. पद्माकर वळवी यांना संपर्क केला असता, त्यांनी तळोदा तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाची या निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. पाडळपूरचे काही कार्यकर्ते भाजपात गेले होते. त्यांचा पराभव झाला त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला आहे. या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला मतदान करून निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती काँग्रेसच्या हातात दिल्या आहेत. या अनुषंगाने ग्रामीण भागातील जनतेशी काँग्रेसची नाळ अधिक घट्ट झाली असल्याचे सांगितले.
तळोदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी यांनी काढलेल्या एका पत्रकान्वये सात ग्रामपंचायतींपैकी नर्मदानगर, रेवानगर, पाडळपूर, व बंधारा या चार ग्रामपंचायतींत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. म्हणून निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे