नवापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:31+5:302021-01-19T04:33:31+5:30

निवडणुकीपूर्वी माघारीअंती तालुक्यातील धुळीपाडा व सागाळी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील उमराण, धनराट, वडकळंबी, पळसून, ढोंग, ...

Congress dominates 9 gram panchayats in Navapur taluka | नवापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा वरचष्मा

नवापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा वरचष्मा

निवडणुकीपूर्वी माघारीअंती तालुक्यातील धुळीपाडा व सागाळी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील उमराण, धनराट, वडकळंबी, पळसून, ढोंग, रायंगण, उकळापाणी, नांदवन, चेडापाडा, बंधारपाडा, कोठडा, केळी या बारा ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीसाठी एकूण १२ टेबल लावण्यात आली होती. दोन फेऱ्यांत मतमोजणी झाली.

नवापूर तालुक्यातील ढोंग, पळसून, उकळापाणी, वडकळंबी, चेडापाडा,उमराण,बंधारपाडा,केळी, रायंगण या ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा कायम राहिला आहे. यातून तालुक्यातील काँग्रेसचा दबदबा कायम असून माजी मंत्री स्वरुपसिंग नाईक यांचे पुत्र आ. शिरीष नाईक यांच्या निवडणूक रणनीतीला यश मिळाले आहे. याबाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, बिनविरोध झालेल्या धुळीपाडा भाजपाचा दावा आहे तर सागळी बिनविरोध ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.

रायंगण ग्रामपंचायतीत प्रवीण नरसी वसावे, प्रफुल्ल बच्चू वसावे, लक्ष्मी ईश्वर वसावे, अतुल अर्जुन ठिंगळे हे विजयी झाले. रायगण येथे प्रभाग दोनमध्ये दोन स्त्री उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत.

उमराण ग्रामपंचायतीत राहुल गुजरीया गावीत, अबीता दशरत गावित, गोरजी सखाराम गावित, मनीषा योगेश गावीत, वंदना नितीन पाडवी, जितेंद्र देवराम वसावे, वसावे सविता संजय, प्रितीशा चकू वळवी, सदाशिव धर्मा वसावे, सुभाष धनजी वसा, दीपिका सुनील वसावे हे विजयी झाले.

उकाळापाणी ग्रामपंचायतीत कांतीलाल बाबू गावित, गावित रवींद्र जीवा, गावित रुथा सेंगा, गावित विनायक ठगण्या, गावित किर्ती बाळकृष्ण, गावित इला सोना,गावित भिकू देवजी, गावित मीनाक्षी सुपा, गावित कांतु भीमा हे उमेदवार विजयी झाले.

वडकळंबी ग्रामपंचायतीत गावित कनसु रेवा, गावित सप्नना रुध्या, अमरसिंग अनिल गावित, गावित गीता मिलिंद, गावित विनु रवीस, गावित रवीता दिलीप, गावित जितु देवसिंग येथील प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जमाती स्त्री राखीव जागा यापूर्वी बिनविरोध झाली आहे.

पळुसन ग्रामपंचायतीत कोकणी भालेराव तोडु, ठाकरे अमन बाबुलाल हे विजयी झाले.

चेडापाडा ग्रामपंचायतीत वळवी इलु अजित, वसावे अंकुशराव बारक्या, वसावे सुना मनिलाल, वसावे सुनिता अंकुशराव, वळवी अजित शामसिंग, गावीत प्रियंका अनिल हे विजयी झाले.

बंधारपाडा ग्रामपंचायतीत वळवी रजनीकांत वंसत, गावित प्रियंका शंकर, गावित राहुल रवींद्र, अरुणा अनिल गावित, गावित महिमा चिमन, गावित याकूब रमेश, गावित जयमाला महेश, गावित रजनी बाहादुर, गावित अनिल बाबजी, गावित रतीलाल नकटिया गावित अरुणा अनिल हे उमेदवार विजयी झाले.

कोठडा ग्रामपंचायतीत कोकणी विरसिंग, कोकणी वनकर, सुरेखा कोकणी, गावित राहुल अमरसिंग, कोकणी बबिता, गावित रेखा नादल्या, सुरेश मोल्या गावित, गावित लता जाहागु, गावित मीराबाई दामू हे विजयी झाले.

नांदवन ग्रामपंचायतीत गावित अतुल राजु, गावित रविता याकुब, गावित सुनील गमन, गावित हिना दिलीप, गावित अरुणा पारत्या, गावित अंकुश लाजरस, गावित दिव्या सुभाष हे उमेदवार विजयी झाले.

ढोंग ग्रामपंचायतीत गावित सुनील किशन, पाडवी रवीश बावा, वळवी मीनाक्षी अविनाश, कोकणी देवराम ब्रिजलाल, कामळे कलावंती किशन, गायकवाड अनिताबाई कृष्णा, वळवी वीरसिंग बारक्या, कोकणी सोमीबाई मंगलदास, वळवी अल्का सुनील हे उमेदवार विजयी झाले.

धनराट ग्रामपंचायतीत गावित दिनकर भान्या, गावित शरद शिवाजी, गावित अशोक सहदेव, गावित मनीषा संदीप, वसावे दीपिका हरिष, गावित केवजी बापू, गावित जीजा वारीश, गावित हेमलबाई सुभाष हे उमेदवार विजयी झाले आहेत.

केळी ग्रामपंचायतीत गावित रवींद्र राजाराम, गावित दिलवरसिंग नाग्या, वसावे प्रमिला रमेश, निलेश पाताऱ्या गावित, गावीत नीलिमा उमेश, गावित जेसोदा सवलत, गावित उमेश वीरजी, गावित अनिता प्रवीण, वसावे सुगंती जितेंद्र हे विजयी झाले आहेत.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, नासिर पठाण, पोलीस हेड काॅन्स्टेबल निजाम पाडवी, प्रवीण मोरे, पंकज सूर्यवंशी, चंद्रशेखर चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने झाला फैसला

नवापूर तालुक्यातील वडकळंबी ग्रामपंचायत पंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये रिता दिलीप गावित आणि विनू रवीश गावित यांना समान ११८ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात विनू रवीश गावित ह्या विजयी झाल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत मतमोजणी घेण्यात आली. उमेदवार व त्याच्या प्रतिनिधींना मास्कशिवाय तहसील कार्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. सहा टेबलवर मतमोजणी वाॅर्डनिहाय घेण्यात आली. ईव्हीएम मशीन निर्जंतुकीकरण करून उमेदवारांच्या हाताला सॅनिटायझर लावून मतमोजणीस सुरुवात झाली. तासाभरात १२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला.

विजयी उमेदवारांनी जल्लोष न करता साध्या पद्धतीने आनंद साजरा केला. या निवडणुकीत अनेक नवीन तरुणांना संधी मिळाली आहे.

दरम्यान, चेडापाडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रियंका अनिल गावित या केवळ एका मताने निवडून आल्या आहेत. त्यांना १३८ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार वंदना प्रीतेश गावित यांना १३७ मते मिळाली. त्यांच्या या चुरशीच्या लढतीची मतमोजणीस्थळी चर्चा सुरू होती.

Web Title: Congress dominates 9 gram panchayats in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.