केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:13+5:302021-06-01T04:23:13+5:30
केंद्रातील मोदी शासनास ७ वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. कोविड साथरोगाच्या ...

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन
केंद्रातील मोदी शासनास ७ वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. कोविड साथरोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयश, लसीकरणात आलेले अपयश, पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव आणि महागाई, देशाची ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदी आणि जीएसटीमुळे झालेली देशाची दुर्दशा, संपूर्ण देशातील वाढती बेरोजगारी, शेतकरी विरोधी काळे कायदे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की आदी गोष्टींचा यात समावेश आहे. काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून राज्यातील जनतेला या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी रविवार, दि ३० मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष हाजी मकसूद खाटीक, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अशोक मुकरंदे, स्वरूप बोरसे, इकबाल खाटीक, भास्कर पाटील, काॅंग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष नरेश पवार, विजय राजपूत, शहर उपाध्यक्ष भास्कर सोनवणे, शांतीलाल पाटील, रुपेश भरवाड, इकबाल कुरेशी, देवा चौधरी, पंडितराव पवार, हाजी युनिस कुरेशी, राजू पाटील आदी उपस्थित होते.