शिवरायांचे विचार आचरणात आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:24 IST2020-03-13T12:24:08+5:302020-03-13T12:24:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : युवकांनी केवळ सोशल मिडीयात न अडकता शिवचरित्राचे वाचन करावे, सोशल मिडीयातून शिवचरित्र कळत नाही ...

शिवरायांचे विचार आचरणात आणा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : युवकांनी केवळ सोशल मिडीयात न अडकता शिवचरित्राचे वाचन करावे, सोशल मिडीयातून शिवचरित्र कळत नाही ते वाचून समजून घेत आचणात आणावं लागतं़ युवकांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचतील, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी केले. मराठा गल्ली परिसरात शिवजन्मोत्सव कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले़
जय खंडेराव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जय हनुमान व्यायाम शाळा व खंडेराव बॉईज ग्रुपतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला़ कार्यक्रमास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, ज्येष्ठ पत्रकार सुर्यभान राजपूत, पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती विलास रघुवंशी, युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, नगरसेवक गौरव चौधरी, प्रविण गुरव, मनोज चव्हाण, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, रोहिदास पवार, हिरालाल मराठे, मराठा पंचमढी मंडळाचे सचिव प्रल्हाद मराठे, बाबा राजपूत, जितेंद्र मराठे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजू रगडे, पावबा मराठे, विनायक मराठे, भप्पू मराठे, विकास पवार, राहुल मराठे, लल्ला मराठे, किरण पाटील, खुमेश मराठे, प्रविण मराठे आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ यानंतर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला़ मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले़ कार्यक्रमात गजेंद्र शिंपी यांनी शिवभक्तांनी संघटीत होवून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करावा, आपापसातील मतभेद बाजूला ठेवत शिवाजी महाराजांच्या विचारांचे आचरण करुन संघटीत व्हावे असे सांगितले़ सूत्रसंचालन कृष्णा मराठे यांनी तर आभार सुदर्शन मराठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गणेश मराठे, मधुकर मराठे, आबा बडगुजर, मयुर मराठे, कैलास मराठे, सचिन मराठे, देवेंद्र मराठे, दिपक मराठे, योगेश मराठे, बाळा मराठे, गोटन मराठे, बंटी मराठे, शांतू मराठे, योगेश मराठे, आकाश मराठे, सागर सोनार, भूषण मराठे, सारंग शिंपी, देवांशु राजपूत, कमलेश जळोदकर, गौरव रामोळे, कल्पेश भोई, शुभम भोई, सत्यम भोई, चेतन राजपूत, पवन राजपूत, पवन मराठे यांनी परिश्रम घेतले.