काठी आरोग्य केंद्र इमारतीला गळती लागल्याने रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:10 IST2019-11-03T13:10:23+5:302019-11-03T13:10:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण इमारतीला सध्या पडणा:या पावसामुळे गळती लागली ...

काठी आरोग्य केंद्र इमारतीला गळती लागल्याने रुग्णांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण इमारतीला सध्या पडणा:या पावसामुळे गळती लागली आहे. त्यामुळे स्लॅबच्या खाली प्लास्टीक कागद बांधून आधार देण्यात आला आहे. या प्रकारामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
काठी आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब गळका झाला आहे. पावसाळ्यात तर भयंकर बिकट परिस्थिती होते. सद्यस्थितीतही अधूनमधून पाऊस होत असल्याने ही इमारत गळते. परिणामी रुग्णांचे हाल होतात. यावर उपाय म्हणून स्लॅबच्या खाली प्लास्टीक कागदाचा आधार देऊन गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. या इमारतीची दुरुस्ती करून रुग्णांचे होणारे हाल थांबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने येणा:या रुग्णांची गैरसोय होते. काही रुग्णांना मोलगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नेमण्याची गरज आहे.
मागणी काठी येथील सरपंच स्नेहा जितेंद्र पाडवी यांच्यासह दिलवर पाडवी, मांगीलाल पाडवी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.