काँक्रीट कचरा पुनर्रवापर काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:59 IST2019-09-16T11:58:58+5:302019-09-16T11:59:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बांधकाम क्षेत्रात काँक्रीट कच:याचा पुर्नवापर या विषयावर अभियंता दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ...

काँक्रीट कचरा पुनर्रवापर काळाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बांधकाम क्षेत्रात काँक्रीट कच:याचा पुर्नवापर या विषयावर अभियंता दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात भारतर} सर मोक्षगुंडम विश्वेैेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा अभियंता असोसिएशन तर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. उद्घाटन डॉ. संजय कोयंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, अमरदीप मोरे, योगेश वाघ, असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पटेल, मिलिंद शहा, महेश चौधरी ,सुभाष चौधरी, विलीन धुरकुंडे ,संजय देसले, कमलेश चौधरी, फिरदोस लोखंडवाला, दिग्विजय नरसे, डॉ. संजय उपाध्ये आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात कोयंडे यांनी बांधकाम क्षेत्रात काँक्रीट कच:याचा पुनर्वापर या विषयावर माहिती दिली. तर डॉ.संजय उपाध्ये यांनी ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर बोलताना सांगितले की, वाईटातून चांगले शोधले पाहिजे. मन प्रसन्न असेल तर सर्वसिद्धी प्राप्त होत असते. मन अप्रसन्न होण्याची कारणे शोधली पाहिजे. आनंदी देशांच्या यादीत भारत 135 व्या नंबर वर आहे. मनात काही धरून ठेवले तर तुमचा रक्तप्रवाह मोकळा वाहत नाही. मन मोकळे जगता आले पाहिजे जिथे उणीव आहे तेथे जाणे हा नैसर्गिक स्वभाव आहे. नोकरीवरून घरी गेल्यानंतर माणसाने स्वभावात बदल करून वडील व मित्र बनले पाहिजे. इंग्रजी शिक्षणात आत्मा व मातीचे नाते नाही म्हणून इंग्रजी शिक्षणाची वाईट परिस्थिती आहे. जात्याचे दोन दगड म्हणजे आईबाप आत मध्ये विद्याथ्र्यांचे धान्य व त्यातून बाहेर पडते ते विद्यापीठ अशी अवस्था आहे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे काम पुरुषाचे आहे. निरोगी व विनोदी पुरुष हे समृद्ध घराचे लक्षण आहे. जीवन जगणे हा बुद्धिबळाचा डाव आहे. त्यातील खेळी खेळता आली पाहिजे, कोणते प्यादे केव्हा चालवायचे ते कळले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुहास जानवे यांनी मानले.