Concerning the plot plot | प्लॉटच्या वादातून हाणामारी
प्लॉटच्या वादातून हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे प्लॉटच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती़ याप्रकरणी अक्कनकुवा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे़
सोरापाडा येथील कांतीलाल पोसल्या वळवी व जयसिंग पोसल्या वळवी या दोघा भावांमध्ये सोरापाडा गावातील टावरजवळच्या प्लॉटवरुन वाद झाला होता़ दरम्यान गुरुवारी प्लॉटवर तार कंपाउंड करण्यात आल्याची माहिती कांतीलाल वळवी यांना मिळाली त्यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर दोघा भावांमध्ये वाद झाला होता़ यातून जयसिंग वळवी, सूरज वळवी याच्यासह त्याच्या ट्रॅक्टरवरील दोन चालक तसेच कांतीलाल वळवी, विमलबाई वळवी, अनिल व नितीन वळवी यांच्यात जोरदार भांडण झाले़ दरम्यान दोन्ही गटात हाणामारी करण्यात येऊन एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली़
याबाबत कांतीलाल वळवी यांच्या फिर्यादीवरुन जयसिंग, सूरज याच्यासह ट्रॅक्टरचे चालक यांच्याविरोधात तर जयसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरुन कांतीलाल, विमलबाई व अन्य दोघांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल जाधव व पोलीस हेड कॉन्स्टेबल कडवे करत आहेत़

Web Title: Concerning the plot plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.