सेंधवा येथे तिघांना कोरोनाची लागण झाल्याने वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:17 IST2020-04-06T12:16:50+5:302020-04-06T12:17:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथे कोरोनाचे ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ यामुळे सीमावर्ती भागात ...

Concern increased due to corona infection at Sendhwa | सेंधवा येथे तिघांना कोरोनाची लागण झाल्याने वाढली चिंता

सेंधवा येथे तिघांना कोरोनाची लागण झाल्याने वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथे कोरोनाचे ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ यामुळे सीमावर्ती भागात एकच खळबळ उडाली असून खेडदिगर येथील सीमेवर पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे़
मध्यप्रदेशातील बड़वानी जिल्ह्यातून एकूण ११ स्वॅब नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते़ यातील चौघांचे रिपोर्ट शनिवारी रात्री प्राप्त झाले होते़ यातील तिघांचे पॉझिटिव्ह तर एकाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला होता़ यात एक ७५ वर्षीय वृद्ध महिला, ४० वर्षीय महिला आणि १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे़ तिघांना इंदौर येथील आयसोलेशन कक्षात हलवण्यात आले आहे़ तिघा बाधितांच्य संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे़ दरम्यान महाराष्ट्र हद्दीतील गावांमधून अनेकांचा सेंधवा आणि मध्यप्रदेशातील विविध भागात संपर्क आहे़ यामुळे शहादा तालुका व सिमावर्ती भागात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ सध्या सीमा सील असल्याने या भागातील वर्दळ बंद आहे़ परंतू बरेच स्थलांतरीत चोरट्या मार्गाने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात ये-जा करत असल्याने गांभिर्य वाढले आहे़

Web Title: Concern increased due to corona infection at Sendhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.