सातपुड्याचा विना अपघात उत्पादनाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:36 IST2020-02-01T13:36:18+5:302020-02-01T13:36:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रत्येक कर्मचाऱ्याने दैनंदिन काम करतांना आपत्कालीन अग्नी उपद्रव व्यवस्थापन कार्यक्रमातील प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाचा उपयोग ...

सातपुड्याचा विना अपघात उत्पादनाचा संकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : प्रत्येक कर्मचाऱ्याने दैनंदिन काम करतांना आपत्कालीन अग्नी उपद्रव व्यवस्थापन कार्यक्रमातील प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाचा उपयोग करावा. कारखान्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या साहित्याचा नित्य वापर करावा. सन २०२० हे वर्ष ‘विना अपघात उत्पादन’ साजरा करावयाचे आहे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी मॉकड्रील कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दर सहा महिन्यात आपात्कालीन अग्नी उपद्रव व्यवस्थापनेचा आणि प्रात्यक्षिकाचा व मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेतला गेला. अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक पी.आर. पाटील तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून धुळे येथील कॉलेज आॅफ फायर इंजिनिअरींगचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य सुनील सुदाम चौधरी, शहादा नगर परिषदेचे कर निरीक्षक माजी सैनिक सचिन महाडीक, पंप आॅपरेटर रवींद्र चव्हाण, अग्निशामक वाहनचालक प्रकाश चौधरी, फायरमन धर्मा नाईक, धुळे येथील धनेश जाधव, जनरल मॅनेजर अशोक पाटील, अतिरिक्त मुख्य अभियंता धनंजय शेठे, विठ्ठल बेंद्रे, अभियंता मिलिंद पटेल, शरद पाटील, डिस्टीलरी विभागाचे व्यवस्थापक के.बी. पाटील, कामगार अधिकारी प्रविण पाटील, सहायक व्यवस्थापक पी.ओ. सराफ तसेच एक्साईज विभागाचे पायमुडे व त्यांचे अधिकारी, कारखान्याचे लेबर आॅफिसर पुरूषोत्तम पाटील, सर्व केमिस्ट इंजिनिअर उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी संरक्षणाकरीता लागणारे संपूर्ण साहित्य कधीच अपूर्ण पडू दिले जात नाही. उपकरणे वापरल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळेस बोलतांना प्राचार्य सुनील चौधरी म्हणाले की, मॉकड्रील कार्यक्रम हा घेतला गेला पाहिजे. यातून कामगारांना अग्निरोधक फायर एक्सटींग्शर हाताळणे सोपे जाते व नेहमी स्मरणात राहते. म्हणजे एखादी आपत्ती ओढून आली तर त्यावेळेस नेमके कोणत्या प्रकारची आग आहे ही ओळखून त्यावर कोणते फायर एक्सटींग्शर वापरले पाहिजे याचे स्मरण त्वरित होते व अनर्थ टळतो, अनेकांचे जीव वाचू शकतात. याबाबत त्यांनी प्रत्यक्षिक करून घेत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शहादा नगरपालिकेचे अधिकारी सचिन महाडीक यांनी अग्नीचे प्रकार समजावून सांगितले. कोणत्या ठिकाणी कशापासून आग लागू शकते ते विझविण्यासाठी कोणते उपकरण वापरले पाहिजे व काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत माहिती दिली. या वेळी कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी व कमगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे कामगार अधिकारी प्रविण पाटील यांनी केले.