दूरसंचारच्या दुर्लक्षीत सेवेविरुद्ध पुन्हा दोन संघटनांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:22 IST2019-11-07T12:22:22+5:302019-11-07T12:22:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्गम भागात उभारलेल्या  टॉवरद्वारे बीएसएनएलच्या ग्रआहकांना योग्य सेवा मिळत नाही. वारंवार ...

Complaints of two unions again against the neglected telecommunication service | दूरसंचारच्या दुर्लक्षीत सेवेविरुद्ध पुन्हा दोन संघटनांच्या तक्रारी

दूरसंचारच्या दुर्लक्षीत सेवेविरुद्ध पुन्हा दोन संघटनांच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्गम भागात उभारलेल्या  टॉवरद्वारे बीएसएनएलच्या ग्रआहकांना योग्य सेवा मिळत नाही. वारंवार कोलमडणा:या सेवेला कंटाळून धडगाव व मोलगी भागातील ग्राहकांनी टॉवरचीच होळी करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत निर्णय घेतला गेला नसतानाच पुन्हा दोन संघटनांमार्फत  पुन्हा तक्रारी करण्यात आल्या आहे.
मोलगी परिसरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी दूरसंचारमार्फत मोलगी, जमाना, सरी व वेली तर धडगाव तालुक्यात खुंटामोडी, सुरवाणी, कात्री, सिसा या ठिकाणी उभारण्यात आलेले टॉवर वारंवार बंद पडतात. या खंडीत सेवेमुळे संपर्काच्या  अडचणी निर्माण झाल्या आहे. तर सद्यस्थितीत शासनामार्फत करण्यात आलेली शासकीय व खाजगी ऑनलाईन कामेही वेळेवर पूर्ण होत नाही. तेथील ऑनलाईन सेवा सर्वस्वी बीएसएनएलवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन  कामेही याच नेटकर्ववर आधारित आहे. परंतु अशा खंडीत व अविश्वसनीय सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाची ऑनलाईन कामे रखडत आहे. 
वारंवार खंडीत होणारी सेवा दुरुस्त व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु त्याची दुरसंचाने दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या भागातील टॉवरची होळी करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला. याबाबत दुरसंचारने कुठलाही निर्णय  घेतला नसतानाच पुहा भिलीस्थान टायगर सेनेमार्फत अक्कलकुवा तहसिलदारांना तर अनुसूचित  जमाती दक्षता परिषदेमार्फत  धडगाव तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनांवर बीटीएसचे रविंद्र पाडवी, सुरेश पाडवी, गोविंद पाडवी, ब्रिजलाल पाडवी, केशव पाडवी यांच्या सह्या आहेत. 


धडगाव तालुक्यात उभारण्यात आलेले टॉवर हे बीएसएनएल कर्मचा:यांच्या निष्काळजीमुळे संपूर्ण तालुक्यात समस्या निर्माण झाल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जमाती दक्षता परिषदेने निवेदनात नमुद केले आहे. कर्मचा:यांच्या दुर्लक्षामुळेच विद्याथ्र्याची शैक्षणिक कामे व अन्य सर्वच ऑनलाईन कामे रखडत आहे. ही समस्या येत्या पाच दिवसात न सुटल्यास संबंधित कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
4जमाना येथील टॉवर सहा महिन्यांपासून बंदच असल्याने ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून टॉवरची होळी करण्याच्या आंदोलनात भिलीस्थान टायगर सेनाही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Complaints of two unions again against the neglected telecommunication service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.