शाळेच्या आवारातून विद्यार्थिनीला पळवून नेल्याची तक्रार
By Admin | Updated: January 11, 2017 23:25 IST2017-01-11T23:25:35+5:302017-01-11T23:25:35+5:30
शाळेच्या गेटजवळून अल्पवयीन विद्यार्थिनीस तिच्याच भागात राहणा:या युवकाने पळवून नेल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या आईने दिली आहे.

शाळेच्या आवारातून विद्यार्थिनीला पळवून नेल्याची तक्रार
नंदुरबार : शहरातील एका शाळेच्या गेटजवळून अल्पवयीन विद्यार्थिनीस तिच्याच भागात राहणा:या युवकाने पळवून नेल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या आईने दिली आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील स्टेशन रोडवरील एका शाळेच्या गेटबाहेरून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीस गवळीवाडा भागात राहणा:या मनोज प्रल्हाद मिस्तरी या युवकाने अमिष दाखवून पळवून नेले. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. मुलीचा ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मनोज मिस्तरी याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शाळांच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर उनाड मुलांचा राबता राहत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासूनचे आहे. शाळा भरण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी दामिनी पथक आणि पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.