नंदुरबार येथे किरकोळ वादातून एकमेकांविरोधात विनयभंगाची फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:26 IST2019-09-04T12:26:17+5:302019-09-04T12:26:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इमामू नगर आणि कुरेशी मोहल्ल्यातील दोन कुटूंबात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून विनयभंगाची परस्पविरोधी ...

नंदुरबार येथे किरकोळ वादातून एकमेकांविरोधात विनयभंगाची फिर्याद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील इमामू नगर आणि कुरेशी मोहल्ल्यातील दोन कुटूंबात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून विनयभंगाची परस्पविरोधी फिर्याद देण्यात आली आह़े 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला आह़े याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आह़े
प्रथम दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार ईमामू नगर परिसरात राहणारी बालिका मैत्रिणींसोबत 31 ऑगस्ट रोजी मैत्रींणींसोबत खेळत असताना मोहीन सफरद पठाण रा़ ईलाही चौक हा तेथे आला़ त्याने बालिकेला बळजबरीने ओढून फिरायला चल असे सांगितल़े दरम्यान बालिकेला अश्लील शब्द बोलून लज्जास्पद कृत्य करत बालिकेला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवत मंगळबाजारात सोडून दिल़े घटनेची माहिती बालिकेने कुटूंबियांना दिल्यानंतर त्यांनी संशयित मोहीन याला जाब विचारला असता, त्यांनाही शिवीगाळ केली़ याबाबत पिडित बालिकेने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित मोहीन याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तपास पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील करत आहेत़
यातील दुस:या गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार कुरेशी मोहल्ल्यातील युसूफ मुसा कुरेशी व ईस्माईल मुसा कुरेशी यांनी 1 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोहिन यास कलर काम करण्यासाठी का आला, या कारणावरुन इमाम बादशाह दग्र्यासमोर मारहाण केली होती़ या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी मोहिन याचे कुटूंबिय दोघांकडे गेले असता दोघांनी दोघा महिलांचा विनयभंग करत महिलेस मारहाण केली होती़ याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन युसूफ कुरेशी व इस्माईल कुरेशी या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक ए़आऱइनामदार करत आहेत़
याप्रकरणी सोमवारी रात्री पोलीसांनी ईस्माईल मुसा कुरेशी यास अटक केली आह़े