शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चेडापाडा ग्रामस्थांची रेशनबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  रेशनच्या धान्याची अफरातफर करणा:या बचत गटावर कारवाई करून त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  रेशनच्या धान्याची अफरातफर करणा:या बचत गटावर कारवाई करून त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील चेडापाडा ग्रामस्थांनी केली आहे.      नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांना चेडापाडा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, चेडापाडा गावातील लक्ष्मी महिला बचतगटास शासनाने शिधापत्रिका धारकांना रेशन वाटपासाठी नियुक्त केले आहे. मात्र या बचतगटाकडून शिधापत्रिका धारकांना शासनाने ठरविलेल्या मासिक मानकानुसार धान्य वेळेवर वाटप केले जात नाही. महिन्यातून फक्त एक ते तीन दिवसच धान्य वाटप करतात. तेथील फलकावर धान्य किती शिल्लक आहे व धान्य प्रति किलो काय दराने वाटप करावयास हवे याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती लिहिली जात नाही. नेहमी फलक कोराच असतो. त्यातच ज्या थोडय़ाफार लोकांना धान्य वितरीत होते त्यांना पावतीदेखील दिली जात नाही. गेल्या 10 वर्षात एकही नवीन शिधापत्रिका वितरीत करण्यात आलेली नाही. अश्या अनेक तक्रारी या बचतगटा विरुध्द असतांना 14 जुलै रोजी या बचगटाने रेशनचा शासकीय गहु, तांदुळ व इतर धान्य परस्पर विक्री व चोरटी वाहतूक करण्याच्या हेतुने खाजगी ट्रॅक्टर क्रमांक एमएच 39 - एच 0026 व ट्रॉली क्रमांक  एमएच 39 - एफ 8192 याव्दारे घेऊन जात असतांना गावक:यांनी पकडले असता ट्रॅक्टर पकडणा:या गावक:यांना तुम्हा सर्वाना बघून घेऊ अश्या धमक्या देण्यात आल्या. घटना घडली त्यावेळी पोलीस कर्मचारी सुध्दा हजर होते. रेशनच्या धान्याची अफरातफरच्या घटनेचा पुरावा म्हणून सर्व गावक:यांच्या समक्ष केलेल्या चित्रिकरणाची व्हिडिओफीत व फोटो सादर करण्यात आले       आहे. धान्याची अफरातफर करणा:या व गोरगरीबांच्या हक्काचा रेशन हडप करणा:या चेडापाडा गावातील लक्ष्मी महिला बचतगट व रेशनदुकानदाराचा कायमस्वरुपी परवाना रद्द करावा व संबंधित बचतगटातील सर्व सदस्यांवर कायमस्वरुपी बंदी लावण्यात यावी. जेणे करून हे सर्व सदस्य भविष्यात दुस:याच्या नावाने बचत गट तयार करू शकणार नाहीत व नवीन परवाना घेऊ शकणार नाहीत असे नमूद करून संबंधित बचतगटधारक  व रेशनदुकानदाराची चौकशी करून योग्य व कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे निवेदनाद्वारे सुनीता रामदास वळवी, बेबी किशोर वळवी, मनीला अनिल वळवी, रुखा सुनील वळवी, मंगला जगदीश वळवी, सुनीता वळवी,  सुनीता जयराम भिल, सुना किशन वसावे, रेहाना भरत वळवी यांनी म्हटले आहे.