बाजार भावानुसार भरपाई मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:42 IST2021-02-08T12:42:37+5:302021-02-08T12:42:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना शासन निर्णय नुसार देण्यात येणार आहे. मदत तुटपुंजी ...

बाजार भावानुसार भरपाई मिळावी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना शासन निर्णय नुसार देण्यात येणार आहे. मदत तुटपुंजी असल्याने बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्याची मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी नाशिक पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंग यांच्याकडे केली आहे.
बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील सध्या चार पोल्टीतील नष्ट करण्यात येत आहे. कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत यात प्रामुख्याने विविध दर ठरविण्यात आले आहेत. परंतु नवापूर शहरातील पोल्ट्री व्यवसायिकांनी शासनाने दिलेली मदत तुटपुंजी आहे. बाजारभावानुसार आम्हाला मोठा खर्च येत असल्याने यात वाढ करावी अशी मागणी नाशिक पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंग यांच्याकडे केली. आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी ४०० रूपये, पशुखाद्य १२ रूपये ऐवजी ३२ रूपये द्यावे. कारण पशुखाद्यसाठी लागणारे मका,ज्वारी, सोयाबिन डेप,शिंग डेप,औषधे बाजारात महाग झाले आहेत. बाधित क्षेत्र च्या बाहेरील पशुखाद्य नष्ट केल्याने शासनाचे व पोल्ट्री व्यवसायिकाचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे या पशुखाद्याचा ९० दिवस पर्यंत गोडाऊन सील करावे अशी मागणी असोसिएशन अध्यक्ष आरीफ बलेसरीयासह पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.