सरदार सरोवर पुनर्वसीतांसाठी पावरा भाषेत कम्युनिटी रेडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:25 IST2019-06-14T12:25:28+5:302019-06-14T12:25:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : सरदार सरोवर पुनर्वसन वसाहतींसाठी स्थानिक पावरी भाषेतील रेडियो स्टेशन सुरु करण्याचा निर्णय मंत्रालय स्तरावर ...

सरदार सरोवर पुनर्वसीतांसाठी पावरा भाषेत कम्युनिटी रेडिओ
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : सरदार सरोवर पुनर्वसन वसाहतींसाठी स्थानिक पावरी भाषेतील रेडियो स्टेशन सुरु करण्याचा निर्णय मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गा:हाणे निराकरण प्राधिकरणाचे डॉ. अफरोज अहमद यांनी दिली.
धडगाव तालुक्यातील भूशा येथे पाच सहकारी संस्थांना राज्य शासनाने केलेल्या वित्त पुरवठ्यातून बंदिस्त मत्स्य पालन प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. आदिवासी शेतक:यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळु लागले आहे. त्या प्रकल्पाची पाहणी डॉ. अफरोज अहमद शुक्रवार, 14 रोजी करणार आहेत. राज्य शासनाचे मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. भूशा येथील आणखी पाच सहकारी संस्थांना बळकटी देउन एका वेळी कोटीच्या घरात उत्पन्न काढु शकतील असे पाठबळ राज्य शासनाकडून त्या दहा सहकारी संस्थांना पुरविण्यात येणार असल्याचेही डॉ. अहमद यांनी सांगितले.
सरदार सरोवर पुनर्वसनच्या 11 वसाहतींमधे मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या असुन त्याचा परिणाम म्हणून विस्थापित मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. त्यांच्यासाठी पावरी बोलीभाषेत रेडियो स्टेशन सुरु करण्याचा निर्णय पुनर्वसन सचिव किशोर निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून त्यासाठी जागा निश्चिती करून ते केंद्र लवकर सुरु करण्यासाठी राज्य शासनाचे प्रय} असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.