आदिवासींसाठीच्या योजनांच्या आढाव्यासाठी समिती आज जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:33 IST2019-07-29T12:33:00+5:302019-07-29T12:33:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी भागात राबविण्यात येणा:या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखालील ...

आदिवासींसाठीच्या योजनांच्या आढाव्यासाठी समिती आज जिल्ह्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी भागात राबविण्यात येणा:या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखालील समिती सोमवारपासून जिल्ह्यात येत आहे. समिती योजनांचा आढावा घेण्यासह विविध ठिकाणी भेटी देखील देणार आहे.
आदिवासी भागात राबविण्यात येणा:या सर्व योजनांमुळे आदिवासींच्या जिवनात कशा प्रकारे परिणाम झाला आहे. त्यांच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी कोणत्या योजना प्रभावीपणे राबविता येतील याचा आढावा घेवून त्या अनुषंगाने शासनाला शिफारस करण्यासाठी शासनाने माजी आमदार विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत आहे. पंडित यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे.
या समितीचा दौरा सोमवार व मंगळवार असे दोन दिवस नंदुरबार जिल्ह्यात राहणार आहे. समिती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक देखील घेणार आहे. त्यासाठी आदिवासींसाठी राबविण्यात येणा:या विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवाय त्याची अंमलबजावणी, झालेले परिणाम याचीही माहिती घेतली जाणार आहे.
समिती अचानक कुठल्याही आश्रम शाळेला किंवा वसतिगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेला भेट देणार आहे. यासाठी नंदुरबार व तळोदा प्रकल्प अधिकारी यांनी नियोजन केले असून सर्व संबधीत अधिकारी यांना सुचीत करण्यात आले आहे.
सोमवारी समिती नंदुरबार, प्रकाशा, शहादा, रामपुर आणि धडगाव येथील अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केद्रास भेट देणार आहे. शिवाय रामपुर ता.शहादा, मांडवी ता.धडगाव, भांग्रापाणी, डाब आश्रमशाळा व ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे भेट. सेंट्रल किचन, एकलव्य रेसिडेन्शिअल पब्लिक स्कुल, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा येथे भेट देणार आहेत.