खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:57+5:302021-03-19T04:28:57+5:30
लस दिल्यानंतर रूग्णांना अर्ध्या तासापर्यंत वैद्यकीय नियंत्रणाखाली ठेवण्यात येत असून, त्यानंतर काही त्रास न झाल्यास घरी जाण्यास परवानगी देण्यात ...

खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला प्रारंभ
लस दिल्यानंतर रूग्णांना अर्ध्या तासापर्यंत वैद्यकीय नियंत्रणाखाली ठेवण्यात येत असून, त्यानंतर काही त्रास न झाल्यास घरी जाण्यास परवानगी देण्यात येत आहे.
लस घेण्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागत असून, त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड सोबत नेऊन रजिस्ट्रेशन केले जात आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच लस दिली जात आहे. दरम्यान, ग्रामीण रूग्णालयात सोमवार ते गुरुवार दररोज लस दिली जाणार असून, यासाठी समुपदेशक लाजरस गावीत, अधिपरिचारिका दीपा गावीत, सविता वळवी, किरण देवरे, सुरेश मोरे, समाधान अहिरे हे नियोजन करत आहेत.
खांडबारा ग्रामीण रुग्णालयाबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्र पळसून व डोगेगाव येथेही लसीकरणाची सोय उपलब्ध केलेली असून, त्याचा माध्यमिक शिक्षक, ६० वर्षांवरील वृद्ध व आजार असलेली ४५ ते ५९ वर्ष वयोगटांतील रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप वळवी, पळसूनचे डॉ. योगेश वळवी व डॉ. सचिन वळवी यांनी केले आहे.