खेतिया येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:30+5:302021-02-05T08:11:30+5:30
खेतिया आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना लसची प्रतीक्षा होती. पहिली लस आशा कार्यकर्ती सविता बादल व परिचारिका कला रावताळे यांना देण्यात ...

खेतिया येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ
खेतिया आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना लसची प्रतीक्षा होती. पहिली लस आशा कार्यकर्ती सविता बादल व परिचारिका कला रावताळे यांना देण्यात आली. लस घेतल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. वैद्यकीय अधिकारी डॉ .नेहा आर्य यांनी सांगितले की, खेतिया येथे लसीकरणासाठी १९० डोस दिले आहेत. त्यात आरोग्य विभाग, आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांचे लसीकरण सुरू झाले आहे, असे सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमन मोदी, डॉ. प्रियंका रघुवंशी, डॉ. राम कुशवाह, औषधनिर्माण अधिकारी कुलदीप ठाकरे, मनू जैन, जितेंद्र पाटीदार, संजय निकुम, चेतन ठाकूर, दिनेश चव्हाण, अरविंद शितोळे, कमलेश ब्राम्हणे, बादल रामा, बसंत सीन, राधा बडोडिया, किरण पाठेकर, अनिता सोलंकी, गायत्री गिढोडे, ज्योती बोरसे, अश्विन सोनीस, मंगल बर्डे, अंजली डावर, सुनील भदाणे, मोतीलाल रावताळे, आशा कार्यकर्ती जयश्री पाटील, सुचिता सोलंकी, कविता चंद्रत्रेय आदी उपस्थित होते. खेतिया आरोग्य केंद्रात लसीकरणाची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.